Crime News: Drug addict stabs young man in the neck, saying 'murder fix'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा करत तुने मुझे पैसे नहीं दिये, अभी पैसे 5 दे, नही तो तेरा मर्डर फिक्स, असे म्हणत एका नशेखोराने मजुराच्या गळ्यावर वार ने करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न न केला. ही घटना सोमवारी (दि.२९) रात्री व ८:३० वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील रेणुकानगर येथे घडली. अरबाज शेख नसीर (१९, रा. रेणुकानगर, गल्ली क्र. ४) असे आरोपीचे नाव असून, , त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी (दि.१) त्याला न्यायालयात हजर 5 केले असता ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी न सुनावल्याची माहिती सहायक पोलिस ड निरीक्षक वर्षा काळे यांनी दिली.
ने फिर्यादी सचिन शिवलाल बोहरे . (३२, रा. रेणुकानगर) यांच्या न फिर्यादीनुसार, आरोपी अरबाज याला ते लहानपणापासून ओळखतात. तो नशा डे करण्याच्या सवयीचा आहे. तो नेहमी नशा न करून कोणालाही पैसे मागतो. तीन दिवसांपूर्वी देखील घराजवळ येऊन त्याने सचिन यांना नशेसाठी पैशांची मागणी केली होती. त्याला पैसे नाही असे सचिन यांनी सांगितले होते.
तेव्हा अरबाजने "पैसे नही दिया तो तेरा मर्डर फिक्स है" अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२९) रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास सचिन हे काम संपवून घरी परतत असताना सोळुंके किराणा दुकानाजवळ आरोपी अरबाज उभा होता.
त्याने पैशांच्या कारणावरून सचिन यांची कॉलर पकडली आणि त्यांना अंधारात कोपऱ्यात ओढत नेले. "तुझे मैने पैसे मांगे थे, तुने नहीं दिये, अभी पैसे दे, नही तो तेरा मर्डर फिक्स" असे म्हणून चाकूने सचिन यांच्या मानेच्या डाव्या बाजूला जोरात मारले. सचिन यांना सुरुवातीला काहीच सुधारले नाही, रक्तबंबाळ झाल्यावर ते घाबरून तेथून पळत सुटले. पुंडलिकनगर ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना घाटीत नेले.
ठाणेदारांसमोर गुंडगिरी रोखण्याचे आव्हान
पुंडलिकनगर हद्दीत अनेक गुन्हेगारी टोळ्या, नशेखोर, गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला आहे. अनेक गंभीर गुन्हे या भागात घडत असताना यापूर्वीचे ठाणेदार त्यावर नियंत्रण ठेवण्यात कमी पडल्याचे दिसले. पोलिस आयुक्तांनी त्यांची बदली केल्यानंतर आता नव्याने आलेले पोनि राजेंद्र मुढे यांच्याकडे ठाण्याची धुरा दिली आहे. त्यांच्यापुढे नशेखोरी, गुंडगिरी, गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असणार आहे.
जेलमधील मामाच्या नावाने दहशत
आरोपी अरबाज याचा मामा एका गंभीर गुन्ह्यात सध्या हर्सल जेलमध्ये आहे. त्याच्याच नावाने अरबाज या भागात शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.