Municipal elections : चिन्ह वाटपावरून निवडणूक कार्यालयांमध्ये गोंधळ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal elections : चिन्ह वाटपावरून निवडणूक कार्यालयांमध्ये गोंधळ

चिन्ह बदलून दिल्यानंतर तक्रारींचा पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Confusion in election offices over symbol allocation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मनपा निवडणूक रिंगणात उरलेल्या अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप शनिवारी (दि.३) करण्यात आले. यावेळी चिन्ह वाटपांवरून विविध निवडणूक कार्यालयांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. वंचित आघाडीला काही ठिकाणी विविध चिन्हे मिळाले होते. परंतु त्यांनी सर्वांनाच गॅस सिलडरचा आग्रह धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी-५ येथील प्रभाग ९ मधील वंचितच्या सर्वच उमेदवारांना चिन्ह बदलून दिल्याने इतर पक्षांच्या वतीने तक्रार करण्यात आली.

चिन्ह वाटपांत वंचितच्या उमेदवारांना विविध चिन्ह मिळाले. पक्षाने वंचितच्या उमेदवारांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्ज दिलेला आहे. त्यानुसार राज्यभर आम्हाला गॅस सिलिंडर चिन्ह दिलेले असल्याने येथेही तेच चिन्ह देण्याची मागणी केली. मात्र वंचितला गॅस चिन्ह अधिकृतरीत्या दिलेले नसल्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान प्रभाग क्र. ९ मधील वंचितच्या सर्वच उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाचे मेणबत्ती चिन्ह देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न केला. या बाबत एमआयएमसह इतर पक्षांनी तक्रार केली. तक्रारीवर काय निर्णय घेतला याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक अधिकारी प्रवीण फुलारी यांचा रात्री उशिरापर्यंत फोन स्विचऑफ होता.

इतर ठिकाणी मागणीनुसार चिन्ह

वंचितच्या सर्वच उमदेवारांना गॅस सिलिंडर चिन्हे द्यावी ही मागणी योग्य नसल्याची भूमिका घेत क्रमांकानुसार केलेल्या मागणीच्या आधारे इतर कार्यालयांत चिन्हे वाटप करण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी वंचितला नारळ तर काही ठिकाणी गॅस सिलींडर तसेच इतर चिन्ह देऊन हा वाद निकाली काढण्यात आला.

घोषणाबाजीमुळे वातावरणात तणाव

दरम्यानच्या गरवारे स्टेडीयमवर चिन्ह वाटपानंतरही यात बदल केल्याने वंचित एमआयएमचे कार्यकर्ते समोरा समोर येऊन घो-षणाबाजी करत होते. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. तक्रारीवर काय निर्णय घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांचा मोबाईल रात्री उशिरापर्यंत स्विच ऑफ मिळून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT