HPV Vaccine | ‘एचपीव्ही’लस घ्या... गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर टाळा w_lenu_nu541255
छत्रपती संभाजीनगर

HPV Vaccine : एचपीव्ही लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Confusion among citizens regarding HPV vaccination

घाटनांद्रा, पुढारी वृत्तसेवा :

आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम मागील पंधरा दिवसांपासून राबविण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये विविध प्रकारचे संभ्रम निर्माण झाले असून काही सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अपूर्ण किंवा भ्रामक माहितीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक पालक आपल्या मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.

एका आरोग्य केंद्राच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, शाळा स्तरावरही पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. तरीदेखील अद्यापपर्यंत केवळ विद्यार्थिनीनेच ही लस घेतल्याची माहिती आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक सुराणा यांनी दिली.

दरम्यान, आरोग्य विभागाने ही लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे स्पष्ट केले असून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT