Sambhajinagar Crime : पोलिस आयुक्तांकडे तक्रार करताच विद्यार्थिनींना छेडणारे गजाआड  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : पोलिस आयुक्तांकडे तक्रार करताच विद्यार्थिनींना छेडणारे गजाआड

स्पोर्ट बाईकची रेस करून मुली घाबरल्याचे व्हिडिओ करायचे व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

Complaint to Police Commissioner, Damini team handcuffs two for harassing female students

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा कॉलेज परिसरात स्पोर्ट बाईकवरून येऊन रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या मवाल्याची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करताच दामिनी पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या. बाईकचा कर्कश आवाज व रेसिंगने मुलींना घाबरवून त्यांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा हा प्रकार सुरू होता. शुक्रवारी (दि.५) एमजीएम कॉलेज परिसरात प्रकार हा उघडकीस येताच दोन आरोपींना जेरबंद केले.

शेख समीर शेख सलीम (रा. इंदिरानगर, बायजीपुरा गल्ली क्र. १९) असे स्पोर्ट बाईकस्वार आरोपीचे नाव असून, सय्यद इजाज सय्यद मुख्तार (रा. सिडको) हा मोपेडवरून त्याचे व्हिडिओ शूट करायचा. याप्रकरणी सिडको ठाण्यात करण्यात आला. डको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलानी स्पोर्ट बाईकस्वार छेड काढत असल्याची तक्रार केली. पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत तात्काळ दामिनी पथकाला पाचारण केले.

जमादार कल्पना खरात, सुनीता नागलोद, अंबिका दारुंटे, सरिता कुंडारे, कविता गवळी यांनी एमजीएम कॉलेज परिसरात काही मुलींनी भेट घेतली. चौकशीत मुलींनी सांगितले की, एक जण कॉलेज परिसरात विनाक्रमांकाच्या स्पोर्ट बाईकवरून कर्कश सायलेन्सरने फटाक्यांचे आवाज व हॉर्न वाजवत सुसाट, वेडीवाकडी बाईक चालवीत येतो. मुलींसमोरून जोरजोरात बाईक रेस करून सायलेन्सरचा कर्कश आवाज करून घाबरवत आहे. हा प्रकार दररोज सुरू असून, काही मुलींचा पाठलाग करून अश्लील हावभाव करतो. त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याचे सांगून काही व्हिडिओही दाखवले.

दहशतीमुळे कोणीही पुढे येईना

दामिनी पथकाने व्हिडिओमधील तरुणांबाबत एमजीएम परिसर आणि जिन्सी हद्दीत जाऊन नागरिकांना विचारणा केली. मात्र त्या दोघांच्या दहशतीमुळे कोणीही बोलण्यास किंवा समोर येऊन तक्रार देण्यास तयार झाले नाही. शेवटी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने आरोपी समीर आणि इजाज दोघांची नावे निष्पन्न केली.

गजाआड होताच जोडले हात

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सिडकोचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, छावणीचे प्रभारी एपीआय विवेक जाधव, अंमलदार रवींद्र देशमुख यांनी दोघांच्या मुसक्या आवळून पोलिस ठाण्यात नेले. समीरला लॉकअपमध्ये टाकताच त्याने हात जोडले. दरम्यान, समीर हा भंगार व्यावसायिक असून, रिल्स बनविण्यासाठी तो महागड्या गाड्यांचा वापर करत होता. आयफोन, स्कूटी, कॅमेरा पोलिसांनी जप्त केला.

तब्बल १४ कलमे लावून गुन्हा नोंद

शहरातील महिला, मुलींची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे यापूर्वीच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले होते. रोडरोमिओंना ( सरळ करण्यासाठी आयुक्तांचे एक विशेष पथकही ( फिरून रोमिओंना लाठीचा प्रसाद देत आहे. दरम्यान, ( समीर आणि इजाजविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात बीएनएस, मोटारवाहन अधिनियम, पर्यावरण, पोलिस ( अधिनियम, माहिती तंत्रज्ञान असे १४ कलमे लावून गुन्हा नोंद केला. समीरला अटक करण्यात आली आहे.

कॅनॉट भागात हे रोजचेच

कॅनॉट प्लेस भागात स्पोर्ट बाईक, कार, बुलेटस्वार रात्रीच्या वेळी अक्षरशः धुमाकूळ घालतात. महिला, तरुणीसमोरून कर्कश हॉर्न, सायलेन-सरचे आवाज काढून फेऱ्या मारतात. टोळक्याने हे प्रकार सुरू आहेत. मात्र याकडे पोलिसांना लक्ष देण्यास वेळ नाही. रात्री अकरा वाजता बंद करण्याच्या सूचना देताना पोलिसांची गाडी फिरते एवढेच.

मोबाईलवर संपर्क करून माहिती द्या अवैध दारू, अमली पदार्थ विक्रेते, रस्त्यावर दारू पिणारे, गोंधळ घालणारे, महिला, मुलींचे छेड काढणारे, रस्त्यावर हुल्लडबाजी करत वाढदिवस साजरे करणारे, बुलेटवरून सायलेन्सरचे फटाके फोडणारे दिसताच पोलिस आयुक्तांच्या ९२२६५१४००१ या क्रमांकावर माहिती द्या. नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT