knife attack pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नास नकार दिल्याने महिलेवर चाकूहल्ला

चार मुलांच्या आईला लग्नाची गळ घालणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केला. ही घटना रविवारी (दि.१३) रात्री १:३० वाजेच्या सुमारास गुलाबवाडी, जयभीमनगर येथे घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रमेश कसबे (रा. काबरानगर, गारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.

रविवारी (दि. १३) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपी विशाल हा महिलेच्या जयभीमनगर येथील घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजवून महिलेला बाहेर बोलावले आणि तू माझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहेस की नाही, अशी पुन्हा विचारणा केली. महिलेने ठामपणे नकार देत एवढ्या रात्री का आलास, असा जाब विचारला.

याचा राग आल्याने संतापलेल्या आरोपीने स्वतःजवळील चाकूने महिलेच्या उजव्या हाताच्या दंडावर वार करून तिला जखमी केले आणि तेथून पळून गेला. या घटनेनंतर जखमी महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने बेगमपुरा ठाणे गाठले आणि घाटी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार वाडेकर हे करत आहेत.

रक्षाबंधनाला झाली होती ओळख

३० वर्षीय फिर्यादी महिला ही आपल्या चार मुलांसह गुलाबवाडी, जयभीमनगर येथे आईकडे राहते. काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनानिमित्त ती गारखेडा येथील बहिणीकडे गेली असता, तिथे ओळखीचा असलेल्या आरोपी विशालने तिची भेट घेऊन लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मला चार मुले असून तुझ्याशी लग्न करायचे नाही असे सांगून महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT