Sambhajinagar bike theft : दुचाकी चोरीचा नवा पॅटर्न उघड; गाड्या ३ हजारांत विकून थेट भंगारात विल्हेवाट

चोरट्यासह गॅरेज कामगाराला बेड्या, १८ गुन्हे उघड, ७ दुचाकी जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरासह ग्रामीण भागातून दुचाकी चोरायच्या, त्या अवघ्या तीन हजार रुपयांत गॅरेजमध्ये विकायच्या आणि तिथे त्या गाड्यांचे सुटे भाग करून ते थेट भंगारात विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गाडीचे अस्तित्वच नष्ट करण्याच्या या पॅटर्नमुळे चोरीच्या गाड्या शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्यासह गॅरेज कामगाराला अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शेख इरफान शेख सरवर (२७, रा. चौसर नगर, उस्मानपुरा) आणि गॅरेज कामगार मुदस्सीर अन्सार शेख (२३, रा. संजय नगर, बायजीपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गॅरेज मालक अब्दुल रहमान जियाउद्दीन (रा. म्युझिक कॉलनी, रोशन गेट) हा अद्याप फरार आहे.

Crime News
Parbhani Crime : मारहाणीची तक्रार देणाऱ्यालाच कोतवाली पोलिसांची दमदाटी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित शेख इरफान याला उस्मानपुरा भागातून ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा त्याने कबुली दिली. इरफानच्या कसून चौकशीत एकूण १८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या टोळीकडून ७ दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. सुटे भाग करून भंगारात विकण्याच्या या प्रकारामुळे अनेक गाड्यांची विल्हेवाट लागल्याचा संशय आहे.

याप्रकरणी फरार असलेल्या गॅरेज मालकाचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून, पुढील तपासासाठी आरोपींना चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक लहू घोडे, हवालदार विठ्ठल डोके, विजय धुमाळ, सनी खरात, महेश बिरुटे, संदीप कोळगे, योगेश तरमळे, जीवन घोलप यांच्या पथकाने केली.

Crime News
Jamboti Honey Project : ‘जांबोटी हनी’साठी पाच कोटींचा आराखडा

असा चालायचा सुटे भाग विकण्याचा गोरखधंदा

इरफान हा चिकलठाणा, बिडकीन, सिडको, बेगमपुरा आणि खुलताबाद या भागांतून दुचाकी चोरायचा. या चोरीच्या गाड्या तो नारेगाव येथील झेड. आर. ऑटोमोबाईल व एकता ऑटोमोबाईल येथे काम करणारा मुदस्सीर आणि गॅरेज मालक अब्दुल रहमान यांना केवळ तीन हजार रुपयांना विकायचा. चोरीच्या गाडीचा कोणताही पुरावा मागे राहू नये आणि गाडी ओळखू येऊ नये, यासाठी गॅरेज मालक अब्दुल रहमान हा या गाड्यांचे सुटे भाग (पार्ट्स) वेगळे करून ते थेट भंगारात विकून मोकळा व्हायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news