पेठवडगाव शहराला पावसाने झोडपलेSambhaji Nagar Rain News : सलग दुसऱ्या दिवशीही वादळासह पावसाने झोडपले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Rain News : सलग दुसऱ्या दिवशीही वादळासह पावसाने झोडपले

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट ताशी ४५ ते ५० किमी वाऱ्याचा वेग

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar was lashed by rain along with storm for the second consecutive day.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सलग दुसऱ्या दिवशी वादळीवारा,मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात गुरुव ारी (दि.१२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहर व परिसरात दमदार पाऊस बरसला. यावेळी सुमारे १५ ते २० मिनिटे ४५ ते ५० प्रतितास वाऱ्याचा वेग होता.

या वादळीवार्याने शहरातील तुरळक ठिकाणची झाडे पडली असून, सखल भागात पाणी तुबंले होते. काही भागांत नाले ओसंडून वाहिल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळासाठी शिव-ाजीनगर भुयारी मार्गातील वाहतूक खोळंबली होती.

शहरात सामान्य असलेल्या वातावरणात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक बदल झाला. विजांच्या कडकडाटासह ताशी ४५ ते ५० वेगाने वादळीवाऱ्यार्यात मेघ गर्जनेसह काही भागांत दमदार पाऊस बरसला. वेगवान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांत धुळीचे साम्राज्य पसरले होते. वादळीवाऱ्याने शहरातील ज्युबली पार्क, पवननगर, चिश्तिया कॉलनी, आंबेडकर चौक, उल्कानगरी या भागातील झाडे उन्मळून पडली.

अग्रिशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदतकार्य करीत पडलेली झाडे बाजूला केली. दरम्यान काही वेळ बरसलेल्या दमदार पावसामुळे शहरातील टिळकपथ, औरंगपुरा,उस्मानपुरा, गारखेडा, शिवाजीनगरसह पहाडे कार्नर आणि पुंडलिकनगर येथे सखल भागांत पाणी साचले होते. तसेच पहाडे कार्नर, उस्मानपुरा, पीरबाजार, कटकटगेट, रोशनगेटसह काही ठिकाणचे नाले ओसंडून वाहत होते.

त्यामुळे रस्त्यावर गुडघाभर साचलेल्या पाण्यातून पादचाऱ्यांना जिकरीने वाट काढावी लागली. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने दुचाकी ढकलून नेताना चालकांची तारांबळ उडाली. दरम्यान एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ४५.६ किलोमीटर प्रतितास व २.८ मिमी पावसाची नोंद झाली, तर एमजीएम गांधेली हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ५७.२ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे आणि ८.७ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच एमजीएम पडेगाव स्कूल हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ४०.७किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला.

पुढील दोन ते तीन दिवस वेगवान वाऱ्याचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी वातावरण निर्माण होत आहे. दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात पुढील दोन तीन दिवस असेच वारे अपेक्षित आहेत, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

अर्धे शहर अंधारात

वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच ज्युबली पार्क, छावणी, बेगमपुरा, मध्यवर्ती बसस्थानक रोड, गारखेडा परिसर सिडको, आझाद चौक, जसवंतपुरा, जकात नाका, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, अहिंसानगर, म्हाडा कॉलनी एन-२, रामनगर, चिकलठाणा, नाथ व्हॅली, रोशनगेट, सिटी चौक, गणेश कॉलनी, आरतीनगर, मयूर पार्क, सुरेवाडी, नक्षत्रवाडी, सुधाकरनगर, खंडोबा मंदिर परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच नंदनवन कॉलनीत मुख्य रस्त्यावरील लाईनवर झाड कोसळल्याने खांब वाकून तारा तुटल्या. तसेच घाटी रुग्णालयाच्या आवारातही बीज वाहिनीवर झाड कोसळले. पावसाचा अडथळा येत असतानाही वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT