Sambhaji Nagar Municipal Election : प्रभागांमुळे वाढणार उमेदवारांची डोकेदुखी
Municipal Election : Voters of 4 wards will have to handle
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा : शहरात दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. परंतु ही निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, चार वॉर्डाचा एक प्रभाग रा हणार आहे. प्रभाग पद्धत राजकीय पक्षांसाठी लाभदायक असली तरी उमेदवारांना चार वॉडाँतील मतदार संभाळावे लागणार असल्याने मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल १० वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यात यंदा निवडणुका या प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच प्रत्येक पक्षातील इच्छुक कामाला लागला आहे. अनेकांनी आपल्या वॉर्डालगतच्या इतर तीन वाँडाँमधील मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाग पद्धतीमुळे मिनी विधानसभाप्रमाणेच प्रत्येकाला तयारी करावी लागणार असल्याचेही काही इच्छुकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा आहे. सक्षम असणाऱ्या इच्छुकांनी पक्षांकडून उमेदवारी मिळो अथवा ना मिळो, निवडणुकीत उभे राहायचेच, या दृष्टीकोणातूनच तयारी सुरू केल्याचेही चित्र काही वॉर्डामध्ये दिसत आहे.
दरम्यान, प्रभाग पद्धतीचा सर्वाधिक लाभ हा सत्ताधारी आणि विरोध पक्षात असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना होईल, तसेच यात अपक्ष उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, अशीही शक्यता काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

