Chikalthana Aairport Accident : चिकलठाणा विमानतळावरील अपघाताची आठवण ताजी

३२ वर्षांनंतरही आगीचे लोळ, धुरांचे लोट डोळ्यासमोर
Chikalthana Aairport Accident
Chikalthana Aairport AccidentFile Photo
Published on
Updated on

Chikalthana airport accident fresh in memory

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून इंडियन एअरलाईन्सचे विमान मुंबईला जाण्यासाठी झेपावले. दरम्यान विमानाची चाके कंपाऊंडच्या तारत अडकून दिशा बदललेले विमान जालना रोडकडे जाणाऱ्या कापसाच्या ट्रकवर आदळले.

Chikalthana Aairport Accident
Ahmedabad plane crash | पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये, विमान अपघातस्थळाची केली पाहणी, जखमीला दिला धीर

यात विमानाचे तीन तुकडे होऊन यात ५५ जणांनी जीव गमावला, तर ६३ जणांना वाचवण्यात यश मिळाले होते. अशाचा प्रकारचा विमान अपघात गुरुवारी (दि.१२) अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा झाला. या अपघातामुळे ३२ वर्षांपूर्वी चिकलठाणा विमानतळावर झालेल्या अपघाताच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत, अहमदाबाद आणि चिकलठाणा विमानतळावरील विमान अपघातात मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येत आहे.

२६ एप्रिल १९९३ या दिवशी छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणारे इंडियन एअरलाईन्सचे ४९१ (बोईग ७३७) विमान दुपारी उाण करताच विमानतळाचे कंपाऊंडच्या तारांत विमानाचे चाक अडकल्याने त्याची दिशा बदलली ते जालना रोडकडे वळले व तेथे कापसाच्या ट्रकला धडकून ते वरुडकाजी येथील मोकळ्या मैदानात कोसळले.

Chikalthana Aairport Accident
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत 261 ठार, एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला

यात विमानाचे तीन तुकडे होऊन त्यात आग पसरली. या आगीत ५५ जणांना होरपळून जीव गेला. अशाही स्थितीत ६३ जणांचा जीव वाचवण्यात यश मिळाले होते. अपघातादरम्यान आगीचे लोळ आणि धुरांचे लोट ३२ वर्षांनंतरही आठवत असतानाच गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताने या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हे विमानही उड्डाण करताच अवघ्या दहा मिनिटांत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळले.

तर चिकलठाणा विमानतळावरील इंडियन एअरलाईनचे विमान अवध्या आठ मिनिटांत कोसळले होते. ३२ वर्षांपूर्वी झालेला अपघात हा राज्यातील सर्वात मोठा अपघात होता. त्याच प्रमाणे गुरुवारी अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात अशाचा प्रकराचा असल्याने शहरवासीयांच्या अंगावर भीतीने पुन्हा शहारे उमटले होते.

अपघातात बरेच साम्य

अहमदाबाद आणि चिकलठाणा विमानतळावर झालेल्या विमान अपघातात बरेच साम्य दिसून येत आहे. असे असले तरी अपघात हा अपघातच आहे. मी स्वतः अपघाताचा अनुभव घेतला आहे. त्यात माझा जवळचा मित्र गमावल्याने त्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. - अनिल भालेराव.

घरांच्या गर्दीचा धोका कायम

विमान अपघातानंतर विमानतळावर अनेक खबरदाऱ्या घेतल्या असून, यात रणवेची लांबी वाढवण्यात आली आहे. तसेच विमानतळावर लागणारे लैंडिग इन्स्ट्रुमेंटल सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र भूसंपादनामुळे रखडलेल्या विस्तारीकरण आणि विमातळाला लागूनच असलेल्या उंच इमारती आजही उभ्या असून, मोठ्या विमानांना आजही धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news