Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : तुषार शिसोदे यांना घायाळ बंधूनी धमकावले

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सुनावणीदरम्यान राडा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: क्रांती चौक परिसरातील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात सुनावणी सुरू असताना, मुख्य साक्षीदाराला शिवीगाळ करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन विक्रम घायाळ (वय ४७) आणि रवींद्र विक्रम घायाळ (वय ५२, दोघे रा. पन्हाळानगर, पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तुषार काशीनाथराव शिसोदे (वय ५४, रा. मातोश्री तारक हाउसिंग सोसायटी, बीड बायपास रोड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी (दि. १५) दुपारी २ वाजेच्या सुमारास क्रांती चौक येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

फिर्यादी तुषार शिसोदे हे या सुनावणीसाठी कार्यालयात उपस्थित होते. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुनावणी सुरू असतानाच, तिथे उपस्थित असलेल्या सचिन घायाळ आणि रवींद्र घायाळ या दोघांनी तुषार शिसोदे यांच्याकडे पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यात हा मुख्य साक्षीदार आहे, याला बघावे लागेल, अशी दमदाटी करत शिसोदे यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. शिसोदे यांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून सचिन घायाळ आणि रवींद्र घायाळ यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT