Crime Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime news : छत्रपती संभाजीनगर हादरले! टीसी काढायला आलेल्या विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकू हल्ला

चाकू ऑनलाईन मागविल्याचे पोलीस तपासात स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar crime news

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून टीसी (दाखला) काढण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चक्क आपल्या वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केला. जखमी शिक्षकांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वीही शिक्षकाबरोबर झाला होता वाद

प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करणारा विद्यार्थी अल्पवयीन असून तो शाळेतून आपला टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आला होता. हा विद्यार्थी पूर्वी याच शाळेत शिकत असताना, त्याचे वर्गशिक्षकांसोबत काही कारणावरून वाद झाले होते.

टीसी घेण्‍यासाठी आल्‍यानंतर पुन्‍हा वाद

आज तो टीसी घेण्यासाठी शाळेत आला, तेव्हा पुन्हा एकदा त्याचा आणि संबंधित शिक्षकाचा वाद झाला. विद्यार्थ्याने आपल्याजवळील चाकू काढून शिक्षकांवर सपासप वार केले. अचानक घडलेल्या घटनेने शाळा परिसरात एकच खळबळ माजली. जखमी झालेल्या शिक्षकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑनलाईन खरेदी केला होता चाकू!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस तपासादरम्यान एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू चक्क एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून खरेदी केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. यावरून विद्यार्थ्याने हा हल्ला पूर्वनियोजित कट रचून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT