Crime News : पोलिस, वाळूमाफियांच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू

सात जणांवर गुन्हा दाखल, वेरूळमधील संतापजनक घटना
Crime News
Crime News : पोलिस, वाळूमाफियांच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

Teacher dies after being beaten by police and sand mafia

छत्रपती संभाजीनगर / वेरूळ / वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर येथील एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी वेरूळ येथे रात्रीच्या वेळी गेलेल्या पोलिस आणि फिर्यादी असलेल्या वाळूमाफियाच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एका निष्पाप शिक्षकाचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना बुधवारी (दि.१०) रात्री वेरूळ येथे घडली. सुरेश मृत सुरेश बोरसे रूपचंद बोरसे (५२, रा. कौशिकी गल्ली, वेरूळ) असे मृताचे नाव असून, ते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते. या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिसांनी सात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

यामध्ये मारहाण करणारे पोलिस आणि टोळक्याचा समावेश आहे. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, नातेवाइकांनी वेरूळ येथील रस्ता चार तास रोखून धरत आक्रोश व्यक्त केला. फिर्यादी अनिता सुरेश बोरसे यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि.१०) रात्री १२ वाजेच्या सुमारास सुरेश बोरसे आणि त्यांचा १२ वर्षांचा भाचा वरद हे आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते. काही वेळातच वरदने धावत घरी येऊन मामांना कोणीतरी मारत असून, गाडीत घेऊन जात आहेत, असे सांगितले.

अनिता आणि त्यांची मुलगी यांनी घराबाहेर धाव घेतली. तिथे पोलिस अशी पाटी असलेली पांढरी कार आणि समोर नंबर प्लेट नसलेली मात्र मागे ३०२ नंबर असलेली काळ्या रंगाची स्कार्पिओ उभी होती. स्कार्पिओमध्ये सुरेश बोरसे यांना काही लोकांनी पकडून ठेवले होते आणि ते मला वाचवा, अशी हाक मारत होते.

Crime News
Sambhajinagar murder case : छावणी पोलिसांच्या एका चुकीने खुनातील आरोपी मोकाट !

बोरसे यांना गाडीत टाकून नेत असतानाच बोरसे यांच्या मुलीने गाडीला आडवे होऊन माझ्या वडिलांना कुठे घेऊन जाता? अशी विचारणा केली. तेव्हा एका व्यक्तीने आपण पोलिस असून, या इसमाने आमच्या सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगून कारवाईची धमकी दिली. मात्र बोरसे यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना गाडीबाहेर काढले. त्यांना तात्काळ वेरूळ आणि नंतर घाटीत नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कलम १०६ (१) आणि १३१ नुसार सात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमके प्रकरण काय?

वैजापूरच्या धोंदलगाव येथील वाळूमाफिया आवारे याचा भावकीसोबत महिनाभरापूर्वी वाद झाला होता. जीवघेण्या हाणामारीत दोन्ही गटांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. आवारे याने दाखल केलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीचे लोकेशन वेरूळ येथे असल्याचे वैजापूर पोलिसांना समजले.

तपास अधिकारी उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, अंमलदार वाल्मीक बणगे पोलिस अशी पाटी लावलेली खासगी कार आणि आवारे याची ३०२ नंबरची काळी स्कार्पिओमध्ये त्याचे चार-पाच साथीदार असे खासगी दोन वाहने घेऊन वेरूळला गेले. तिथे हे आठ ते दहा जण घराघरांत शिरून आरोपीचा शोध घेऊ लागले. शिक्षक सुरेश बोरसे हे घराजवळ गोंधळ सुरू असल्याचे पाहून बाहेर आले. त्यांनी काय झाले? तुम्ही कोण आहात, अशी टोळक्याला विचारणा केली. त्यावर नागरगोजे याने आम्ही पोलिस आहोत, असे दरडावले. त्यांना पोलिस आहेत तर तुमची वर्दी कुठंय? आयकार्ड नाही, पोलिसांची गाडी नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती बोरसे यांनी केली. तेव्हा तू आम्हाला विचारणारा कोण? असे म्हणत टोळक्याने बोरसे यांच्यावर हल्ला चढविला.

सखोल तपास सुरू शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. चार संशियितांनाही ताब्यात घेतले आहे. वैजापूर ठाण्याचे पोलिस आरोर्पीच्या शोधासाठी तिथे गेले होते. त्यांची या प्रकरणात भूमिका तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक

पोलिसांचे नाव टाळले

घटनास्थळी आलेल्या वाहनांमधील लोकांनी व खुलासा केलेल्या पोलिसांनी माझ्या पतीला मारहाण केली म्हणून त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार मृत बोरसे यांच्या पत्नीने दिली. तसेच वैजापूर पोलिस स्टेशन डायरीत उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बणगे हे दोघे खासगी वाहनाने तपासासाठी गेल्याची नोंद आहे. व्हिडिओमध्ये पीएसआय नागरगोजे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच मारहाण करणारे आरोपीही व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत. तरीही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आरोपींची नावे टाळल्याने संशय व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news