शिवसेनेच्या इच्छुकांनीही दिल्या भाजपच्या मुलाखती File Photo
छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेच्या इच्छुकांनीही दिल्या भाजपच्या मुलाखती

अनेकांचे तिन्ही डगरीवर हात, पहिल्याच दिवशी ५०० जणांची हजेरी

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena aspirants also gave interviews to BJP

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुका दहा वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे काहीही करून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. त्यासाठी स्वः पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचीही तयारी अनेकांनी केल्याचा प्रकार गुरवारी (दि.१८) भाजपच्या मुलाखतीवेळी दिसून आला. यात शिवसेना ठाकरे गटाचेच नव्हे तर शिंदेसेनेच्याही काही इच्छुकांनी भाजपच्या मुलाखतीत हजेरी लावून उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांत तब्बल ५०० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींवर जोर दिला आहे. यात भाजपनेही आता इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात भाजपने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले. यात तब्बल ९२२ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मंडळाअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील इच्छुकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, गुरुवारी भाजपच्या विभागीय कार्यालयात या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सकाळी ८ वाजेपासूनच मुलाखती सुरू करण्यात आल्या. यात जालना रोडच्या उत्तरेस मोडणाऱ्या १ ते १८ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या मुलाखतीमध्ये भाजपच्या इच्छुकांसोबतच ठाकरे सेना आणि शिंदे सेनेच्या काही इच्छुकांनीही हजेरी लावल्याची चर्चा होती. प्रमुख्याने हे इच्छुक मोजक्याच प्रभागांसाठी इच्छुक असल्याचेही ऐकावसाय मिळाले. पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यास भाजपकडून उमेदवारी मिळावी, या आशेने त्यांनी या मुलाखती दिल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT