Invest Maharashtra pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maharashtra Investment Summit : ४ उद्योगांकडून ८,२९६ कोटींची गुंतवणूक; ९,५०० रोजगाराच्या संधी

८ लाख ५७हजार ४५२ कोर्टीच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मुंबईत गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारे ८ लाख ५७हजार ४५२ कोर्टीच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. राज्याच्या विविध भागांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. यात छत्रपती संभाजीनगरच्या वाट्याला ८ हजार २२६ कोटींची गुंतवणूक आली आहे. विविध चार उद्योगांच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे सुमारे ९,५०० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, अथर अशा कंपन्यांचे प्रकल्प प्रस्तावित असतानाच संभाजीनगरच्या ऑरिक अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आकर्षित गुंतवणूकीची भर पडत आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट मध्ये राज्यासाठी तब्बल ८ लाखांच्या वर गुंतवणुकीचे करार करण्यात आले. यात संभाजीनगरलादेखील उद्योजकांनी पसंती दिल्याचे समोर आले आहे. यातील तब्बल ८ हजार २२६ कोटींची गुंतवणूक ही संभाजीनगरमध्ये होणार आहे. याबाबत या समिटमध्ये आवश्यक करार पूर्ण करण्यात आले असून, यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीदेखील होणार असल्याने तरुणांना यातून आशा निर्माण झाली आहे.

संभाजीनगरमधील कंपनीनिहाय गुंतवणूक आणि रोजगार

1.एनपीएसपीएल अॅडव्हान्स 1 मटेस्थिल लिमिटेड

गुंतवणूक : ५,००० कोटी रुपये, रोजगार निर्मिती: ३,०००

क्षेत्रः थातू आणि खाणकाम

2. 5 स्टारलाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड

गुंतवणूक : २,७९० कोटी रुपये, रोजगार निर्मितीः ५,१४७ स्थानः शेंद्रा, वाळूज

क्षेत्रः डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान,

3.इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर ए अँड एस इंजिनिअरिंग

गुंतवणूक : ३०० कोटी रुपये, रोजगार निर्मितीः १,०००

क्षेत्रः अभियांत्रिकी

4.व्हॅरॉक इंजिनिअरिंग

गुंतवणूक : २०६ कोटी

रुपये, रोजगार निर्मितीः ४००

क्षेत्रः पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक, बांधकाम, धातू व खाणकाम

आणखी काही उद्योगांकडून गुंतवणूक ?

दरम्यान, या गुंतवणुकीमुळे संभाजीनगरातील औद्योगिक क्षेत्रात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चार उद्योगांशिवाय आणखी काही उद्योगांनीही गुंतवणूक जाहीर केली आहे.

या चार कंपन्यांकडून गुंतवणूक

यासंबंधी सूत्रांच्या माहितीनुसार, एनपीएसपीएल अॅडव्हान्स मटेरियल लिमिटेड, स्टर्ललाईट टेकनॉलॉजीज लिमिटेड, ए अँड एस इंजिनिअरिंग आणि व्हेरॉक इंजिनिअरिंग या चार कंपन्यांचा यात समावेश आहे. या चौघांकडून ही गुंतवणूक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT