सिग्नलवरून वाहने सुसाट निघत असल्याने वयोवृद्धांची अशी दमछाक होत आहे. छाया: सचिन लहाने
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : पादचारी रस्त्याचा राजा फक्त कागदावरच

रस्ता ओलांडणे म्हणजे साक्षात मृत्यूशी गाठ; पादचाऱ्यांसाठी सिग्नलमध्ये वेळेची तरतूदच नाही, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनांचा ताबा

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर : पादचारी हा रस्त्याचा राजा असतो, असा वाहतुकीचा जागतिक नियम आहे. पण स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या शहरात हा राजा चक्क रस्त्यावरचा सर्वात असुरक्षित आणि दुर्लक्षित घटक बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन रस्त्यांचे रुंदीकरण झाले, उड्डाणपुलांची कामे झाली, पण प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मात्र पूर्णपणे विसर पडल्याचे भयावह चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

सिग्नल आहेत, पण पादचाऱ्यांसाठी वेळच नाही!

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मनपाने ५२ सिग्रल बसविले. मात्र त्यातील केवळ ३४ सिसाल सुरू आहेत. उर्वरित सिझल बंद अवस्थेत धूळखात आहेत. सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, क्रांती चौक, महावीर चौक, सिडको चसस्थानक आणि टीव्हीसेंटर यासारख्या अत्यंत गजबजलेल्या आणि सुरू असलेल्या वेळेची तरतूद नाही. हिरवा कंदील लागताच वाहने सुसाट सुटतात. अशा वेळी शाळकरी मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना अक्षरशः धावत-पळत, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.

झेब्रा क्रॉसिंग केवळ शोभेची वस्तू...

सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी आखलेले झेब्रा क्रॉसिंग शहरात केवळ नावापुरते उरले आहेत. लाल सिग्नल लागल्यावर वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे उभी राहणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात बहुतांश वाहने थेट झेब्रा क्रॉसिंगवरच उभी असतात. त्यामुळे पादचाऱ्यांनी नक्की जायचे कुठून? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पादचाऱ्यांना वाहनासोबत रस्ता ओलांडण्याची सक्ती

शहरात महापालिका आणि पोलिस प्रशासनाने पादचाऱ्यांना वाहनांसोबत रस्ता ओलांडण्याची सक्ती केल्याचे चित्र आहे. अगोदरच सिग्नल सुटल्यानंतर वाहने सुसाट निघतात. वाहनाच्या वेगाने वृद्ध, महिला आणि विद्याथ्यांना रस्ता ओलांडणे जिकरीचे ठरत आहे.

प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष

वाहतूक पोलिसांनी मनपाकडे शहरात वाहत्या वर्दळीमुळे आणरवी १० ते १५ ठिकाणी नवीन सिग्रल बसविण्याची गरज असल्याचे कळविले. मात्र, त्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नाही प्रशासनाकडे चाहनांच्या वेगाचे आणि सोयीचे नियोजन आहे, पण ज्या शहरात रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाच्या जीवालाच किंमत नाही, लिये स्मार्ट सिटीचा गाजावाजा नेमका कुणासाठी ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT