Chhatrapati Sambhaji Nagar Crime news  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime | मुकुंदवाडीतील चरस तस्करीत इंदौर कनेक्शन उघड

Chhatrapati Sambhaji Nagar Crime | आणखी चार आरोपी निष्पन्न; अटकेतील पाचही जणांच्या कोठडीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime news

छत्रपती संभाजीनगर : गुजरात व मध्यप्रदेशातून अमली पदार्थ तस्करीचे प्रकार अनेक कारवायांवरून उघड झाले आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी जप्त केलेले दीड किलो चरसही इंदौर येथून आणल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले आहे. या टोळीतील आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीत ५ न्यायालयाने वाढ केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

मोहमद मुजममील मोहमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफान खान (२१, दोघे रा. रहेमान कॉलनी), मोहमद लईखुदिन मोहमद मिराजजोदिन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (१९, रा. कटकट गेट) आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन (४५, रा. अंबिकानगर, गल्ली क्र. ८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सुलतानाचा मुलगाही टोळीत सहभागी असून, तो अद्याप पसार आहे.

स्वतः इंदौरहून आणायचे चरस

कटकटगेट, किराडपुरा भागातील आरोपींनी संशय येऊ नये यासाठी मुकुंदवाडीत भाड्याने खोली घेऊन चरस विक्रीचे रॅकेट सुरू केले होते. आरोपी मुजममील, लोमान, लईखुदिन आणि रेहान यांच्यासह टोळीतील निष्पन्न आणखी चार आर-सप्टेंबरपर्यंत ोपी हे इंदौर येथे स्वतः जाऊन चरस घेऊन येत होते. ग्रॅमची पाकीट तयार करून ७०० रुपयांत विक्री करायचे. मोठ्याप्रमाणात तरुण यांचे ग्राहक आहेत. दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांचे पथक इंदौर येथे जाऊन चरस पुरवठादाराचा शोध घेणार आहे.

शहरात अमली पदार्थांची तस्करी करून तरुणाई नशेच्या खाईत लोटणाऱ्या गुन्हेगारांच्या नांग्या पोलिस ठेचताना दिसत आहेत. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्थापन केलेल्या एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने थेट गुजरातच्या कंपनीतून सिरप, गोळ्या आणून शहरात रॅकेट चालविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आ वळून त्यांची जिथे विक्री करायचे त्याच भागात सोमवारी धिंड काढली, तर मुकुंदवाडी पोलिसांनी मुकुंदवाडीच्या अंबिकानगरात छापा मारून एका खोलीतून महिलेसह पाच आरोपींना दीड किलो चरससह अटक केली होती. पाचही आरोपींची कोठडी संपल्याने तपास अधिकारी उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT