

Maratha Reservation success
बीड : मराठा आरक्षणाच्या लब्धाला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने हैदराबाद व सातारा गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेऊन आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करत अधिकृत जी. आर. जाहीर केला. या निर्णयामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर गावागावांत, चौकाचौकांत गुलाल उधळून, आतषबाजी करून अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला.
गेवराई तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत परिसर दणाणून टाकला. गुलाल उधळून आणि फटाक्यांच्या रो षणाईने चौक सांडून गेला होता. समाजाच्या चेहऱ्यावर समाधान आणि
अभिमानाचे भाव झळकत होते. दरम्यान, केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले, शिवरायांच्या पुतळ्यासमोर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ प्रा.
हनुमंत भोसले, छावाचे शिवाजी ठोंबरे, आदींसह सकल मराठा बांधव उपस्थित होते. नेकनूर गावातही ग्रामस्थांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. विजयामुळे जल्लोषाचे वातावरण पसरले असून गावोगावी ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात येत आहे.
धारूर: मराठा आरक्षणाच्या सरसकट अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे हे आझाद मैदानावर उपोषणास बसलेले होते राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून मराठा समाजास आरक्षण देण्याचा जीआर लागू करताच व जरांगे यांनी उपोषण मागे घेतात धारूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्याची आतिषबाजी गुलालाची उधळण करत या ठिकाणी दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
लातूर, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद गॅझेट लागू मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करून त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे यांची मागणी सरकारने मान्य केल्याच्या तसेच शासन अध्यादेश काढण्याचे जाहीर केल्याच्या निर्णयाचे स्वागत येथील सकल मराठा समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलाल उधळत व एकमेकास पेढे भरवत फटाक्यांच्या आतिषबाजीने केले. छत्रपती शिवरायांचा जयजकार, एक मराठा लाख मराठा, मनोजदादा तुम आगे बढ़ो आदी घो षणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
शिवेंद्रसिंहराजे भोसले व समितीच्या सदस्यांनी जरांगे यांची भेट घेऊन हैदराबाद गॅझेट लागू करीत असल्याची मागणी मान्य केल्याचे जाहीर केले व मराठा समाजबांधवांच्या आनंदाला भरते आले. काही वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले व त्यांनी छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत मनोज जरांगे यांच्याही नावाने जोरदार घोषणाबाजी केली.