

Chhatrapati Sambhaji Nagar crime news
छत्रपती संभाजीनगर : माहेराहून दागिने आणि दहा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत धाराशिव येथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने पत्नीचा छळ केला. हा प्रकार २०२३ ते सप्टेंबर २०२५ या काळात लक्ष्मी कॉलनी, सातारा परिसरात घडला. रामचंद्र किसन बहुरे (३७, रा. पोलिस मुख्यालय, धाराशिव, मूळ बेंबळेची वाडी, ता. पैठण) असे आरोपी पोलिस उपनिरीक्षक पतीचे नाव आहे.
फिर्यादी करिष्मा रामचंद्र बहुरे (२६, रा. लक्ष्मी कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे २३ नोव्हेंबर २०१६ रोजी रामचंद्र यांच्याशी लग्न झाले. त्यांना एक सात वर्षांची मुलगी आहे. सासरी सात वर्षे चांगले गेले. मात्र सातारा परिसरात राहत असताना रामचंद्र चांगली वागणूक देत नव्हते. ते आठवड्यातून एखादवेळी घरी येऊ लागले. करिष्मा यांनी विचारणा केल्यावर मारहाण करत होते. लग्न चांगले लावले नाही, वस्तू दिल्या नाही, हुंडाही दिला नाही. त्यामुळे दहा लाख रुपये आणि दागिने घेऊन ये, असे म्हणून छळ सुरू केला.
करिष्मा यांनी माझे आई-वडील गरीब शेतकरी आहेत. तुम्ही त्यांना पैसे मागू नका, अशी विनवणी केली. त्यानंतर माहेरच्यांशी बोलू देत नव्हते. २०२३ मध्ये नाशिक येथील पोलिस अकादमीत ट्रेनिंगसाठी रामचंद्र पत्नीला घेऊन गेले. दीड महिना नातेवाइकांकडे ठेवले. रविवारी भेटायला यायचे. ट्रेनिंगनंतर सातारा पोलिस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतरही सातारा परिसरातील घरी येत नसत. पोलिस ठाण्यात मुलीला घेऊन करिष्मा या रामचंद्र याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाही पैसे, दागिने आणणार नाही तोपर्यंत बोलणार नाही, घरी येणार नाही, असे ते म्हणत..