Kannad Domestic Dispute Stabbing Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime | घरगुती वाद मिटविण्यास गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून

कन्नड शहरातील धक्कादायक घटना; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

Kannad Domestic Dispute Stabbing

कन्नड : शहरातील पोलीस ठाण्यासमोरील रेणुका ज्वेलर्स दुकानाजवळ सोमवारी (दि. १५ जून) पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घरगुती वादाच्या मध्यस्थीसाठी गेलेल्या एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत नविद अक्रम शेख (रा. टिळकनगर, कन्नड) यांचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, वहाब खान उस्मान खान आणि आदिल खान उस्मान खान (दोघेही रा. करीमनगर, कन्नड) हे सख्खे भाऊ आहेत. रविवारी (दि. १४) रात्री सुमारे ११ वाजता आईला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या प्रकरणी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या वादात समेट घडवून आणण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या नविद अक्रम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांवर नाझीम ऊर्फ मॅक्स मुबीन शेख, अण्णा ऊर्फ साबीर शेख नेहाल आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी चाकूने हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात नविद अक्रम शेख यांचा मृत्यू झाला.

घटनेत आरोपींपैकी मुबीन शेख हाही जखमी झाला असून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तो तेथून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी बाबा मलिक निहाल शेख, अमेर लाला नेहाल शेख, अण्णा ऊर्फ शाबीर शेख निहाल, मॅक्स ऊर्फ नाझीम सत्तार, मतीन शेख युनूस, मोबीन युनूस शेख आणि जफर शेख अमु या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT