Chhatrapati Sambhajinagar Crime: शिक्षक मृत्यू प्रकरणातील व्हिडिओत दिसणारे पोलिस अद्यापही 'अनोळखीच'

भक्कम पुरावा, तरीही कारवाई नाही?; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह
Chhatrapati Sambhajinagar Crime
आरोपींनी वापरलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात 'पोलिस' पाटी असलेली एमएच-२०-जीक्यू-२१९३ क्रमांकाची कार आणि नंबर प्लेट नसलेल्या स्कॉर्पिओचा समावेश आहे. पोलिस पाटी असलेली कार कोणाची, ती वापरणारा मुख्य आरोपी कुठे आहे, हा प्रश्न कायम आहे.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रूळ येथे निष्पाप शिक्षक सुरेश बोरसे यांच्या त्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेत खासगी ळिक्यासोबत उपस्थित असलेल्या वैजापूर राण्यातील पोलिसांना वाचवण्याचा खटाटोप बुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या घटनेचा व्हडिओ व्हायरल झाला असून, त्यात संबंधित लिस स्पष्टपणे दिसत आहेत. मृत बोरसे पंच्या पत्नीच्या फिर्यादीतही पोलिसांचा ल्लेख आहे, असे असतानाही, तपासात मात्र पोलिस अद्यापही 'अनोळखीच' (अज्ञात) आहेत.

शुक्रवारी या प्रकरणातील चार आरोपींना पुजबी कलमांमुळे अवघ्या १२ तासांत जामीन वेळाला. पोलिसांच्या या मेहेरनजरेची चर्चा नसतानाच, घटनास्थळी उपस्थित उपनिरीक्षक गरगोजे आणि अंमलदार बणगे यांच्यावर मद्याप कोणतीही प्रशासकीय किंवा गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) तपासावर श्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Teacher's Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणातील टोळीला मध्यरात्री अटक आणि सकाळी जामीन

उपनिरीक्षक गरगोजे आणि बणगे यांच्या उपस्थितीतच वेक्षकाचे अपहरण व मारहाण झाली. बोरसेंना गाडीत डांबताना त्यांच्या मुलीने प्रतिकार केला. व्हा "आम्ही पोलिस आहोत, बाजूला व्हा, नाहीतर सरकारी कामात अडथळा आणला हणून कारवाई करू," अशी थेट धमकी एका व्यक्तीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भक्कम व्हिडिओ पुरावा असूनही कारवाई शून्य आहे. एलसीबीचे निरीक्षक विजयसिंह राजपूत आणि अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी माध्यमांशी बोलणे टाळत असल्याने संशयाचे धुके अधिक दाट झाले आहे.

अनुत्तरित प्रश्न अन् संशयाचे धुके

फिर्यादीला सोबत का नेले? आरोपीला पकडण्यासाठी फिर्यादी आवारे याच्या टोळीला तपासी अधिकारी नागरगोजे यांनी सोबत का नेले?

पोलिस 'अज्ञात' का?

व्हिडिओ पुरावा आणि फिर्यादीत उल्लेख असतानाही एफआयआरमध्ये पोलिस अज्ञात का?

खासगी वाहनाचा वापर का?

तपासासाठी नियमानुसार वाहन भाड्याने घेण्याऐवजी खासगी वाहनांचा वापर का?

१२ तासांत जामीन कसा ?

निष्पाप शिक्षकाचा बळी जाऊनही आरोपींना अवघ्या १२ तासांत जामीन मिळेल, इतकी कमकुवत कलमे का लावली.

बोरसे कुटुंबाला न्याय कधी ?

विभागीय चौकशी सुरू पोलिस अधीक्षकांनी उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बणगे यांची विभागीय चौकशी लावली आहे. मात्र, त्यांना अद्याप नियंत्रण कक्षातही हलवण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Gadchiroali Murder | महिलेचा खून करणाऱ्या दोघांना १२ तासांच्या आत अटक

विभागीय चौकशी सुरू

पोलिस अधीक्षकांनी उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बणगे यांची विभागीय चौकशी लावली आहे. मात्र, त्यांना अद्याप नियंत्रण कक्षातही हलवण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news