Chhatrapati Sambhajinagar News : बारा महिने पाणी देणाऱ्या बारवचे नागरिकांनी जतन करावे : शितोळे File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : बारा महिने पाणी देणाऱ्या बारवचे नागरिकांनी जतन करावे : शितोळे

वानखेडेनगरातील दीडशे वर्षे जुन्या बारवेतून पाच ट्रक कचरा काढला

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Barav BJP City District President Kishore Shitole

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बारव आपल्या संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. त्याचे जतन करा, असे आवाहन भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले.

केंद्र सरकारच्या सलग ११ वर्षे यशस्वी कारभार पूर्तीनिमित्त रविवारी (दि. १५) किशोर शितोळे यांच्या नेतृत्वात निसर्गप्रेमींसह शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी वानखेडेनगर येथील सुमारे दीडशे वर्षे जुन्या बारवची स्वच्छता करून पाच ट्रक कचरा काढत या बारवचे पुनर्निर्माण केले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, लश्मीकांत थेटे, राजगौरव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृतात केंद्रातील सरकारने सलग ११ वर्षे यशस्वीपणे कारभार सुरूआहे. याचे औचित्य साधून भाजपतर्फे देशभरात सेवा सुशासन व गरीब कल्याणाचे यशस्वी ११ वर्षे हे अभियान राबविण्यात येत आहे. रविवारी सकाळी ६:३० ते १०:३० या वेळेत वानखेडेनगर येथील जुन्या बारवची स्वच्छता करत पुन्हा जिवंत केली.

या बारवमधुन परिसरातील ३०० पेक्षा अधिक घरांना व संस्थांना वापरण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी शिवाजी दांडगे, महेश माळवतकर, राहुल रोजतकर, सतीश ताठे, अशोक जगधणे, अशोक वळसे, सागर पाले, मीना मिसाळ, भारती राजपुत, पूजा सोनवणे यांच्यासह मनपा घनकचरा उपायुक्त नंदकिशोर भोंबे तसेच मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह निसर्गप्रेमींची उपस्थिती होती.

संस्कृतीचे उत्तम उदाहरण

बारव हे आपल्या संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. आज आपण तीनशे फुटांपेक्षा अधिक खोल बोर घेतो, तरी त्याला पाणी लागत नाही. मात्र आपल्या पूर्वजांनी २५ ते ३० फुटांवर बारव तयार करून पाणी दिले आहे. त्यामुळे त्याचे जतन करा, असे आवाहन भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT