airport safety rules pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : विमानतळ परिसराचा १५ कि.मी. क्षेत्रात लेझर, बीम लाईट्सवर बंदी

५ जुलै २०२६ पर्यंत बंदी घालण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विमानतळावरून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होताना वैमानिकांचे लक्ष विचलित होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विमानतळ परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सच्या वापरावर ५ जुलै २०२६ पर्यंत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम किंवा फार्म हाऊसवरील पार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर आणि बीम लाईट्सचा वापर केला जातो. या तीव्र प्रकाशझोतामुळे वैमानिकांच्या (पायलट) दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो. विमान उतरवताना किंवा उड्डाण करताना लक्ष विचलित होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये लागू करण्यात आला आहे.

विमानतळाच्या १५ किलोमीटर अंतराच्या परिघांमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर किंवा मालकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांना शिक्षेस पात्र धरले जाईल.

विमानतळ परिसरातील सर्व मंगल कार्यालयाचे मालक, फार्म हाऊस चालक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त पवार, यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT