धर्माबादमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता इशारा; पालक व नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान

स्व: संरक्षणासाठी कराटे, जुडो यासारख्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असेही सांगण्यात आले आहे
Women Empowerment
Womens saftyPudhari
Published on
Updated on

धर्माबाद : नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने धर्माबाद शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण प्रतिबंधात्मक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेषत: मुलींच्या सुरक्षेबाबत पालक शाळा महाविद्यालय व ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसार पालकांनी आपल्या मुलीला एकटे बाहेर पाठवू नये. शाळा ट्युशन किंवा बाजारात जाताना त्यांच्यासोबत विश्वासू व्यक्ती असणे आवश्यक आहे. तसेच लहान वयातील मुलांना "good touch bad touch"या विषयी जागरूक करणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तीच्या संपर्कापासून सावध राहणे आणि मुलांशी मोकळेपणाने संवाद साधने ही पालकांची जबाबदारी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुलींनाही स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचा सल्ला देण्यात आला असून कोणतीही संशयास्पद किंवा जबरदस्तीची घटना घडल्यास मोठ्याने ओरडून मदत मागावी. तसेच 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे. स्व: संरक्षणासाठी कराटे, जुडो यासारख्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असेही सांगण्यात आले आहे.

गावकरी व नागरिकांनीही आपल्या परिसरात अनोळखी किंवा संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशी ग्वाही देखील प्रशासनाने दिली आहे. तसेच सोशल मीडियावर अफवा, खोटे फोटो किंवा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

शाळा व कोचिंग क्लासेसना विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, शाळा सुटल्यानंतर मुलींना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देणे बसमध्ये महिला मदतनीस ठेवणे तसेच स्वसंरक्षण यावर नियमित मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या या सूचनाचे पालन करून सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news