छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले

निलेश पोतदार

पैठण ; पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे सोमवारी रात्री कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची घटना घडली आहे. जीवन संपवलेल्‍या शेतकऱ्याचे नाव सतीश बाबासाहेब वाकडे रा. सालवडगाव ता. पैठण असे आहे.

तालुक्यातील सालवडगाव येथील कर्जबाजारी झालेल्या सतीश बाबासाहेब वाकडे (वय ३६) या शेतकऱ्याने सोमवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात गळफास लावून जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी सदरील घटनेची माहिती मृत शेतकऱ्यांनी स्वतः फोनवर गावातल्या व्यक्तीला व नातेवाईकांना देऊन आपली जीवन यात्रा संपवली. या घटने संदर्भात गावाचे पोलीस पाटील अशोक ठोंबरे यांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे यांना दिली.

यानंतर तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदरील शेतकऱ्याचे मृतदेह पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला असून, मंगळवारी दि.१६ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT