मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा यांच्यासह शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा यांच्यासह शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Minister Sanjay Shirsat's daughter Harshada, along with all four Shiv Sena candidates, emerged victorious.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, छाया वाकचौरे, अभिजित जीवनवाल आणि राजू राजपूत यांचा समावेश आहे.

मंत्री शिरसाट यांच्या कन्येमुळे हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला होता. त्यांच्या विरोधात भाजपने मयुरी बरथूने यांना मैदानात उतरविले होते. मात्र सुमारे 1000 मताने हर्षदा शिरसाट यांनी बरथूने यांना मात दिली.

तर उर्वरित तीनही उमेदवार 700 ते 1200 च्या फरकाने विजयी झाले आहेत. या प्रभागात भाजपच्या चारही उमेदवारांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांची दोन्हीही मुले या निवडणूकीत विजयी झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT