Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन कामांची सभापतींकडून पाहणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन कामांची सभापतींकडून पाहणी

यावेळी त्यांनी विहिरींची तपासणी करून पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

पुढारी वृत्तसेवा

Chairperson Inspects Jal Jeevan Mission Works

खुलाताबाद, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद पंचायत समिती सभापती सुनीता खंडागळे यांनी गुरुवारी (दि.१४) धामणगाव, लोणी आणि दरेगाव या गावांना भेट देत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विहिरींची तपासणी करून पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. सभापती खंडागळे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत पिण्याच्या पाण्याबाबत भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

वाढत्या उन्हामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. पाणी समस्येचे तत्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

नियमित व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभापती यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT