निकाल एकत्रित जाहीर करता येईल का?, खंडपीठाकडून निवडणूक आयोगाला विचारणा File Photo
छत्रपती संभाजीनगर

निकाल एकत्रित जाहीर करता येईल का?, खंडपीठाकडून निवडणूक आयोगाला विचारणा

निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२) दुपारी १२.३० पर्यंत याबाबत म्हणणे सादर करू असे खंडपीठाला कळविले.

पुढारी वृत्तसेवा

Can the results be announced together? Bench

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिकेच्या निकालावर ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीचा निकालाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वच नगरपालिकेंची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करता येईल का? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी (दि.१) एक सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाकडे केली. त्यावर निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.२) दुपारी १२.३० पर्यंत याबाबत म्हणणे सादर करू असे खंडपीठाला कळविले. त्यामुळे निकालाबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने सुरुवातीला घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार नगराध्यक्ष, नगरपालिका प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र जेथे अर्ज अवैध ठरवण्यासारखे पेच निर्माण झाले आणि त्यामुळे तेथील निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचा सुधारित कार्यक्रम आयोगाने जाहीर केला, त्यावर ३ डिसेंबरच्या निकालाचा परिणाम

निकाल एकत्रित जाहीर करता येईल का?

२० डिसेंबरच्याही निवडणुकांवर होणार असल्याचा युक्तिवाद संबंधित याचिकाकत्याँच्या वकिलांनी सोमवारी (दि.१) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केला. युक्तिवाद ऐकून खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेने वेणेगावकर यांनी सर्वच निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करता येतील का, अशी तोंडी विचारणा केली. त्यावर निवडणूक आयोगाचे वकील सचिन्द्र शेट्ये यांनी मंगळवारी (२ डिसेंबर) दुपारी १२.३० वाजता निवेदन करता येईल, असे खंडपीठापुढे सुनावणीवेळी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे निकाल ३ डिसेंबरला की २१ रोजी, याचा निर्णय मंगळवारी (२ डिसेंबर) होणार असून, त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट होणार आहे.

खंडपीठात सोमवारी पैठण, अंबाजोगाई, उदगीर व कोपरगाव आदी शहरांतील निवडणूक प्रक्रियेनंतरचे आक्षेप नोंदवण्यासह आव्हान दिल्याच्या संदभनि दाखल याचिकावर सुनावणी झाली. सुमारे दोन तास चाललेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने वरीलप्रमाणे निकालाबाबत विचारणा केली.

पेच निर्माण झालेल्या नगराध्यक्षपदासह प्रभागातील निवडणुकीवर ३ डिसेंबर रोजीच्या निकालाचा परिणाम दिसून येणार आहे. निवडणूक काळातील खर्चाच्या तपशीलाबाबतची स्पष्टता नसणार आहे. २ डिसेंबरच्या मतदाना दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली असून, २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाबाबत काय, तेवढ्यासाठी बाहेरगावचे मतदार पुन्हा कोणी येणार नाहीत. तेव्हा २० डिसेंबर ही जास्तच लांबची तारीख असून, त्याआधी निवडणूक घ्यावी, असे अनेक अंगांचे युक्तिवाद सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या दोन तासांच्या सुनावणीदरम्यान करण्यात आले.

त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मतदान जरी २ डिसेंबरला घेण्यात येत असतील तरी ३ रोजीच्या निकालाचा परिणाम २० रोजी होणाऱ्या निवडणुकीवरही होण्याची दाट शक्यता असून, सर्वच निकाल २१ रोजी लावण्यात यावेत, अशीही विनंती खंडपीठात याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती.

यापूर्वीची पार्श्वभूमी

नगराध्यक्ष व प्रभागातील अर्जावरून पेच निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार जेथील निवडणुका २० रोजी होणार आहेत, त्यांचे निकाल २१ रोजी जाहीर होतील. मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, काही याचिकांमध्ये सर्व निकाल एकत्रित घोषित करण्याची विनंती करण्यात आली.

त्यावर सचिंद्र शेट्ये यांनी वरील प्रमाणे निवेदन केले. सोमवारी पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई, उदगीर येथील याचिकाकर्ते न्यायालयात आले होते. सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मूळ पूर्वीच्या कार्यक्रमानुसार उद्या होणाऱ्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झालेली आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारीवृंद केंद्रांवर पोहोचलेलेही आहेत. या बाबींचा विचार करून, न्यायालयाने जेथे निवडणूक होणार आहेत, त्यांना मतदान घेण्याची परवानगी दिली. त्यावर कुठलाही आदेश केला नाही. मात्र मंगळवारी एकत्रित निकालाबाबतीत सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT