Sambhajinagar News : जनगणनेनंतरही रखडवले बीएलओंचे मानधन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जनगणनेनंतरही रखडवले बीएलओंचे मानधन

शासनाचा निधी मिळून महिना उलटला : अद्याप वाटप नाही, महापालिकेविरोधात बीएलओंमध्ये तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

BLO honorarium delayed even after the census

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जनगणनेच्या कामासाठी दिवसंरात्र बूथस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) मानधन आणि भत्ते देण्यास महापालिका प्रशासनाने आता चक्क महिना उलटूनही दिरंगाई केली आहे. शासनाने १६ जुलैपर्यंत मानधनाचे वाटप करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्या खात्यात निधी येऊन महिना उलटत आला तरी बीएलओंच्या खात्यांवर अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. प्रशासनाच्या या कारभारामुळे बीएलओंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जनगणनेच्या कामासाठी महापालिकेकडून शहरातील विविध भागांत बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणे, नोंदी अद्ययावत करणे आणि जनगणनेशी संबंधित विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम बीएलओंनी केले. कडक उन्हासह पावसाच्या काळातही त्यांनी हे काम पूर्ण केले.

कामाच्या मोबदल्यात शासनाकडून मानधन आणि भत्ते देण्यात येणार होते. शासनाने १६ जुलैपर्यंत संबंधितांना मानधनाचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते, मात्र महापालिकेला निधीच दोन दिवस उशिराने प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच निधी प्राप्त झाल्यानंतर तातडीने वितरणाची कार्यवाही होणे अपेक्षित होते, मात्र निधी मिळूनही महापालिका प्रशासनाकडून अद्याप मानधनाचे वाटप झालेले नाही.

त्यामुळे शासनाच्या निधीचे वितरण नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, जनगणनेचे काम पूर्ण करूनही मानधनासाठी बीएलओंना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतरही मोबदला मिळण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. निधी उपलब्ध असतानाही वितरणास विलंब होत असल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या विविध प्रशासकीय प्रक्रियांमुळे मानधन वितरणास विलंब होत असल्याचे सांगितलेशासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही महापालिक तो संबंधितांच्या खात्यावर जमा करव शकत नसेल तर निधी वितरणाच्य प्रक्रियेत नेमकी अडचण कुठे आहे, अस प्रश्न बीएलओंकडून उपस्थित केला. जात आहे.

निधी येऊनही ना भत्ता, ना मानधन

शासनाकडून महापालिकेला निधी प्राप्त झाला आहे. त्यानंतरही मानधन व भत्त्याचे वाटप झालेले नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही तो संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यास प्रशासनाला महिनाभराचा कालावधी का लागत आहे, असा सवाल बीएलओंकडून केला जात आहे. तातडीने मानधन व भत्ते जमा करावा अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT