Deep Puja : अमावस्येनिमित्त दीप पूजन उत्साहात

आजपासून श्रावण महिन्याला प्रारंभ : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
Deep Puja
Deep Puja : अमावस्येनिमित्त दीप पूजन उत्साहातfile photo
Published on
Updated on

Deepa puja is celebrated with enthusiasm on the occasion of Amavasya

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अमावस्येनिमित्त घरोघरी आणि विविध मंदिरांमध्ये दिव्यांचे (दीप) पूजन उत्साहात आणि पारंपरिकरीत्या करण्यात आले. या दिवशी नागरिकांनी आपल्या घरातील सर्व लहान-मोठ्या दिव्यांची व समयांची स्वच्छता करून ते तेला-तुपाची वात लावून प्रज्वलित केले.

Deep Puja
Sillod Crime News : वर्गमैत्रीणच उठली मैत्रिणीच्या जीवावर

अमावस्येनंतर आता श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मशास्त्रात श्रावणमासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद महिना मानले जाते. यंदा श्रावण मासाला १३ ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, ११ सप्टेंबरला श्रावण समाप्त होणार आहे. महिनाभर शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

श्रावण महिन्यात केवळ सोमवारीच नव्हे, तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या व्रतवैकल्यांची परंपरा आहे. रविवारी सूर्यनारायण व्रत, सोमवारी भगवान शंकराचे व्रत, मंगळवारी नवविवाहित तसेच सुवासिनी महिलांकडून मंगळागौरी व्रत, बुधवारी बुध-बृहस्पती व्रत, शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन, तर शनिवारी अश्वत्थ आणि मारुती पूजन केले जाते. यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध मानला जातो. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये विशेषतः दोन पौर्णिमा आणि दोन अमावस्याचा विशेष असा पर्वकाळ असणार आहे.

Deep Puja
Dowry Case : विवाह नोंदणीनंतर हुंड्यासाठी मोडले लग्न

विविध सण-उत्सवाचा काळ

१३ ऑगस्टला श्रावणमासारंभझाला आहे. १५ ऑगस्टला मंगळागौर धार्मिक उपक्रमांसह स्वातंत्र्यदिन साजरा होईल. १७ ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी आहे. १८ ऑगस्टला मंगळागौर पूजन होईल. २३ ऑगस्टला पुत्रदा एकादशी, तर २४ ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार पूजन होईल.

२५ ऑगस्टला मंगळागौर पूजन, २८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि श्रावणी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ३१ ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असून, १ सप्टेंबरला मंगळागौरी पूजन होईल. ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती अर्थात गोकुळाष्टमी, तर ५ सप्टेंबरला गोपाळकाला आणि दहीहंडीचा उत्सव होईल. ७ सप्टेंबरला चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे. ८ सप्टेंबरला शेवटची मंगळागौर असून, उत्थापन किंवा उद्यापन केले जाईल. १० सप्टेंबरला अजा एकादशी आणि ११ सप्टेंबरला पिठोरी अमावस्या, बैलपोळा तसेच श्रावण समाप्ती होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news