छत्रपती संभाजीनगर/ नांदेड/जालना : छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालन्याच्या महापौरपदासाठी भाजपने उमेदवारांच्या नावाची घोषणा शुक्रवारी केली. संभाजीनगरात समीर राजूरकर, नांदेडला कविता मुळे तर जालन्यात वंदना मगरे यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते.
नांदेड महापौरपदासाठी भाजप-शिवसेना आघाडीच्यावतीने कविता संतोष मुळे आणि उपमहापौरपदासाठी दीपकसिंग रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय काँग््रेास-वंचित आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही नामाकंन दाखल केले आहेत.
महापौरपदासाठी दहा फेबुवारीला मतदान असून, दुपारी 3 वाजेपर्यंत तीन उमेदवारांनी एकूण पाच 5 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी धोंगडे यांनी दोन संभाजीनगरात शिंदे सेनेत नाराजी संभाजीनगर महापौरपदासाठी भाजपने समीर राजूरकर यांना उमेदवारी दिली. उपमहापौरपदी शिंदे सेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज दाखल केले. जंजाळ आणि र्त्यंबक तुपे या दोघांनीही अर्ज नेले होते. जंजाळ यांच्या उमेदवारीला पालकमंत्री संजय शिरसाट यांचा विरोध आहे. पक्षाचा निर्णय त्यांना मान्य नव्हता, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्याचे कळते.
जालन्यात मगरे यांची निवड निश्चित
जालना महापालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित समजली जाते. याबाबत अधिकृत घोषणा सोमवारी होणार आहे. जालन्याचे पद अनुसूचित जाती महिला गटासाठी आरक्षित आहे. महापौरपदासाठी 10 तर उपमहापौरपदासाठी 8 नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आले होते. जालन्यात 65 पैकी 41 नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने भाजपकडे हे पद जाणार हे नक्की.