Gold Silver price: सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदी 7 हजारांनी घसरली

सराफ बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली
Gold Silver price
Gold Silver price Pudhari
Published on
Updated on

सांगली : सराफ बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे वेधले गेले आहे.

गुरुवारी सांगलीत सोन्याचा दर 1 लाख 53 हजार रुपये प्रति तोळा होता. शुक्रवारी यामध्ये 700 रुपयांची वाढ होऊन तो 1 लाख 53 हजार 700 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. उलट चांदीच्या दराने शुक्रवारी मोठी गटांगळी खाल्ली. गुरुवारी चांदीचा दर 2 लाख 57 हजार रुपये प्रति किलो होता, तो शुक्रवारी थेट 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत खाली आला. एकाच दिवसात चांदी तब्बल 7 हजार रुपयांनी स्वस्त झाली. सोन्यातील किरकोळ वाढ आणि चांदीची मोठी घसरण, यामुळे बाजारात अस्थिरताआहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news