Bail of 106 accused in bogus call center case rejected
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अमेरिकन नागरिकांना हजारो डॉलर्सचा गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सहा आरोपी वगळता न्यायालयीन कोठडीत असलेल्या नॉर्थ ईस्टच्या १०६ कर्मचाऱ्यांचा जामीन अर्ज सोमवारी (दि.१०) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. देशमुख यांनी नामंजूर केला. तर एका महिलेला २५ जातमुचलक्यावर हजारांच्या वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त मोबाईल, शेकडो लॅपटॉप हे कॉलिंग डेटा, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आदी डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी (फॉरेन्सिक लॅब) एफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र १३ दिवस उलटले तरी अद्याप लॅबचा अहवाल पोलिसांना प्राप्त न झाल्याने तपास पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे.
अधिक माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने २८ ऑक्टोबरच्या रात्री चिकलठाणा एमआयडीसी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. कारवाईत ११६ आरोपी ने अटक केले. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीला नंतर जामीनावर सोडण्यात आले. तर प्रकरणात - उर्वरित सर्व आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यता आली. दरम्यान सर्व आरोपींनी नियमित . जामिनासाठी अॅड. पद्मभूषण परतवाघ यांच्यावतीने न्यायालयात अर्ज सादर केला. अर्जावर सुनावणी वं होऊन सोमवारी एक महिला आरोपी न वगळता सर्व आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.
दरम्यान, सुरुवातीला न मास्टरमाइंड म्हणून अब्दुल फारूख मुकदम शाह ऊर्फ फारुखी याच्यासह भावेश प्रकाश चौधरी (३४, रा. अहमदाबाद), भाविक शिवदेव पटेल (२७, रा. मुंबई), सतीश शंकर लाडे क (३५, रा. अहमदाबाद), वलय पराग व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी यांची पोलिस कोठडी घेऊन तपास सुरू केला, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
गुजरातचा पाजी सापडेना
कोट्यवधींची फंडिंग करणारा गुजरातचा बलवीर वर्मा ऊर्फ पाजी असल्याचे समोर आले. बलवीरचा पुतण्या राजवीरला न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेऊन पोलिसांचे एक पथक अहमदाबादला गेले होते. मात्र त्या पथकाच्याही हाती ठोस काही लागले नाही. पाजी अद्यापही पोलिसांना सापडलेला नसल्याने रॅकेटचा सूत्रधार कोण? असा प्रश्न कायम आहे.
डिजिटल पुराव्यांवर तपास अवलंबून
अमेरिकेच्या एफबीआय कडून तेथील फसवणूक झालेल्या नागरिकांची माहिती पोलिसांनी मागितली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून एक नावही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणाची किती डॉलर्सची फसवणूक झाली हे समोर येऊ शकले नाही. डीसीपी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गीता वागवडे यांच्यासह एपीआय मोहसीन सय्यद, पीए-सआय अमोल म्हस्के, उत्तरेश्वर मुंडे, छाया लांडगे यांचे पथक गुन्ह्याचा तपास करत आहे. मात्र, सर्वकाही डिजिटल पुराव्यांवर अवलंबून असल्याने पोलिसांना फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.