Encroachment Drive : शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात file photo
छत्रपती संभाजीनगर

Encroachment Drive : शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

शहागंज परिसरातील हटवल्या हातगाड्या : ध्वनिक्षेपकाद्वारे रस्ते मोकळे करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Anti-encroachment drive begins in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमणे हटविण्याच्या हालचालींना महापालिकेत वेग आला आहे. आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी (दि. १६) अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर अतिक्रमण विभागाकडून बुधवारी (दि.१८) शहागंज परिसरात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हातगाडीधारकांना हटविण्यात आले.

यासह सर्वच भागात ध्वनिक्षेपकाद्वारे रस्ते मोकळे करण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हातगाडीधारकांसह दुकानांबाहेर साहित्य मांडणाऱ्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण स्वतःहून हटविण्याचे बजावण्यात येत आहे. अन्यथा साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चंपा चौक, रोशन गेट, मुजीब कॉलनी, कटकट गेट, बुढी लेन, शहाबाजार, चेलीपुरा, शहागंज, सिटी चौक, जुना बाजार आणि औरंगपुरा या भागांत मंगळवारी ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आल्या. हातगाड्या रस्त्यावर उभ्या करून व्यवसाय करू नये, तसेच दुकानदारांनी दुकानाबाहेर कोणतेही साहित्य ठेवू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

रस्त्यावर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांचे साहित्य जप्त केले जाईल आणि ते परत केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. यानंतर बुधवारी शहागंज परिसरात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या हातगाडीधारकांना हटविण्यात आले. पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्या लावून व्यवसाय करू नये, अशी ताकीद त्यांना देण्यात आली. दरम्यान अतिक्रमण विभागाकडून गुलमंडी, पैठण गेट आणि उस्मानपुरा परिसरातही कारवाईची सूचना देण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहिमेची पूर्वतयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT