Crime News : रांजणगावात मद्यपीचा हाय होल्टेज ड्रामा file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : रांजणगावात मद्यपीचा हाय होल्टेज ड्रामा

मद्यधुंद इसमाने स्वतःची दुचाकी पेटवून देत रस्त्याच्या मधोमध झोपून जवळपास अर्धा तास रस्ता ब्लॉक केला.

पुढारी वृत्तसेवा

An intoxicated man set his own two-wheeler on fire and lay down in the middle of the road, blocking it for nearly half an hour

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद इसमाने स्वतःची दुचाकी पेटवून देत रस्त्याच्या मधोमध झोपून जवळपास अर्धा तास रस्ता ब्लॉक केला. हा हाय होल्टेज ड्रामा बुधवारी (दि.१८) रात्री रांजणगाव येथील दत्तनगर फाट्याजवळ घडला.

प्राप्त माहितीनुसार रांजणगाव येथील दत्तनगर फाट्याजवळ बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद इसमाने एनआरबी चौक ते सीएट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वतःची दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या मधोमध झोपून रस्ता ब्लॉक केल्याने या रस्त्यावर जवळपास आर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे अंमलदार दयनसिंग जोनवाल, कसबेवाड, घुगे यांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद इसमास रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. तसेच त्यांनी लगतच्या व्यावसायिकांच्या मदतीने पाण्याचा मारा करून दुचाकीला लागलेली आग विझविली. रांजणगाव येथे गल्ली बोळात अवैध दारू विक्री सुरू आहे. सहजासहजी दारू मिळत असल्याने तरुण वर्गासह लहान मुलांना देखील दारू पिण्याचे व्यसन जडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT