

A plot to misappropriate land worth crores by making unauthorized entries in the Registrar’s office record books.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सह दुय्यम निबंधक कार्यालयातील तब्बल ४७ वर्षांपूर्वीच्या (सन १९७९) मूळ शासकीय अभिलेखांमध्ये फेरफार करून ३० कोटी रुपयांहून अधिक बाजारमूल्य असलेली १२.८४ हेक्टर जमीन लाटण्याचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य सूत्रधार बाप-लेकाला अटक केली. मुलगा नितीन मोहन राठोड (वय ३६, दोघे रा. जाधववाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी (दि. १८) दिली.
आरोपी मोहन राठोड मोहन दगडू राठोड (वय ७०) आणि त्याचा नितीन राठोड काम आरोपी विशेष म्हणजे, जमीन खरेदी एजंट म्हणून नितीन राठोडने कार्यालयातीलच कोणाला तरी हाताशी धरून ही बोगस नोंद केल्याचा संशय असून, या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची इसारपावती करून तिघांकडून सुमारे १ कोटी ४५ लाख रुपये उकळल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. करणाऱ्या सह दुय्यम निबंधक कृष्णा खताळ रजेवर असल्याने त्यांच्या जागी अतिरिक्त पदभार सांभाळणारे प्रभारी प्रवीण राठोड यांनी १७ नोव्हेंबर रोजी सिटी चौक ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, अरुण बळवंत कुलकर्णी यांनी मौजे पोखरी येथील गट क्रमांक ६६ मधील ५.९९ हेक्टर जमिनीच्या खरेदीखत क्रमांक ६०२७/१९७९ (दि. २९/१२/१९७९) बाबत संशय व्यक्त करत २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, तसेच ३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या सह जिल्हा निबंधकांकडे १७ मुद्द्यांवर तक्रार अर्ज दिला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक (क्र. १) कृष्णा भीमराव खताळ यांनी कार्यालयातील जुने अभिलेख तपासले असता धक्कादायक बाबी समोर आल्या. हार्ड कॉपी (बारनिशी खंड) आणि डे बुकमधील दस्त क्र. ६०२७/१९७९ ते ६०३०/१९७९ या चारही नोंदींसाठी वापरलेल्या पेनाची शाई व हस्ताक्षर लगतच्या मागील केली आहे.
या चारही दस्तांवर लावण्यात आलेले शासकीय शिक्के आणि तत्कालीन सह दुय्यम निबंधकांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सन १९७९ च्या सूची क्रमांक ०२ मध्ये या चारही दस्तांची कोणतीही नोंद आढळून आली नाही.
सातबाऱ्यावर नोंद घेण्याचा प्रयत्न अन् निबंधकांना थेट धमकी
१४ एप्रिल २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयाच्या अभिलेखांमध्ये या चार बनावट नोंदी घालण्यात आल्या. त्यानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी आरोपी मोहन दगडू राठोड याने बनावट दस्त क्रमांक ६०२७/७९ च्या आधारे पोखरी गट क्रमांक ६६ मधील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी मांडकी सजाच्या तलाठ्यांकडे दावा दाखल केला. एवढेच नव्हे तर, चौकशी सुरू असताना २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास मोहन राठोड याने ६ ते ८ जणांना सोबत घेऊन नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयात धडक दिली. तेथे त्यांनी सह दुय्यम निबंधक कृष्णा खताळ यांना तुम्ही संभाजीनगर येथे एकटे राहता, तुम्हाला बघून घेऊ, अशी उघड धमकी दिली.
एजंट मुलाचा कार्यालयात वावर; इसारपावतीतून उकळले १.४० कोटी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हडप करण्याचा प्रयत्न झालेल्या चारही जमिनींचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अटक केलेला आरोपी नितीन राठोड हा निबंधक कार्यालयाच्या परिसरात एजंटची कामे करतो. त्यामुळे त्याचा कार्यालयात नेहमीच वावर होता.
याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने कार्यालयातीलच कोणाला तरी हाताशी धरून मूळ अभिलेखांमध्ये या बनावट नोंदी घुसडल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. एवढेच नव्हे तर, बनावट खरेदीखताच्या आधारे ही जमीन आपलीच असल्याचे भासवून नितीनने दुसऱ्यांना जमिनीची 'इसारपावती' देखील करून दिली होती.
या माध्यमातून त्याने दोघांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये, तर एकाकडून तब्बल १ कोटी ४० लाख रुपये उकळल्याचे समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांचा आणि कार्यालयातील साथीदार आणि टोळी रडारवर आली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गंभीरराव करत आहेत.