Sambhajinagar News : तू जे बोलतोस त्याचा आताच रिझल्ट दाखवतो file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : तू जे बोलतोस त्याचा आताच रिझल्ट दाखवतो

आम्रपाली हॉटेल चालकाची एसटीच्या चालक-वाहकाला धमकी

पुढारी वृत्तसेवा

Amrapali Hotel Operator Threatens ST Bus Driver and Conductor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या चालक-वाहकाने लस्सी मागितल्याने त्याला नकार देत कन्नड रोडवरील आम्रपाली हॉटेल मालकाने तुझा आम्हाला काही फायदा नाही, तू इथून निघ, असे म्हणत गुरुवारी (दि.२६) त्यांना हॉटेलातून हकलून दिले. हॉटेल मालक एवढ्यावरच थांबला नाही तर तू जे बोलतोस ना त्याचा आताच रिझल्ट दाखवतो, असे धमकावतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एसटीने अनेक मार्गावरील हॉटेलवर थांबे दिले आहेत. या थांब्यावर बस थांबवणे बंधनकारक आहे अन्यथा चालक-वाहकांवर एसटीकडून कारवाई होते. गुरुवारी दुपारी धुळे-छत्रपती संभाजीनगर लालपरी दुपारच्या सुमारास कन्नड रोडवरील आम्रपाली हॉटेलवर थांबली. बसचेही चालक वाहक तसेच प्रवासी त्या ठिकाणी थांबले.

दरम्यानच्या काळात या बसच्या चालक-वाहकाने लस्सीची मागणी केली. हॉटेल मालकाने ते देण्यास नकार दिला, पैसे देतोय लस्सी का देत नाही, असा जाब विचारताच हॉटेल चालक संतप्त झाला आणि त्या चालक-वाहकाला अरेरावी करत हॉटेलातून हाकलून लावल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये थांब तुला आताच तुझा रिझल्ट देतो, असे म्हणत धमकावल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, दुपारपासून आम्रपाली हॉटेलचा व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.

अस्वच्छता, जेवणाचा दर्जा खराब

या हॉटेलवर अस्वच्छता आणि जेवणाचा दर्जा खराब असल्याचे यापूर्वी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावर आजपर्यंत एसटीकडून कुठलीही कारवाई झाली नाही. या हॉटेल मालकाला अधिकारी पाठीशी घालत असल्याने हे सर्व घडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. एरव्ही बस थांबली नसेल तर तात्काळ कारवाईसाठी पेन उचलणारे अधिकारी मात्र याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. यामुळे चालक वाहकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

व्हिडिओ पाहिलाच नाही आम्रपाली हॉटेलबाबत अद्याप एकही तक्रार नाही. गुरुवारी असा काही प्रकार घडला त्याचा व्हिडिओ मी पाहिलेला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची तपासणी करून योग्य ती कारवाई करणार आहे.
संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT