Ajintha accident : अजिंठा घाटात ट्रेलरचे बेक निकामी

चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला,वाहतूक विस्कळीत
Ajintha accident
अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात ट्रेलरचे बेक निकामी होऊन झालेल्या अपघातानंतर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. pudhari photo
Published on
Updated on

फर्दापूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात मालवाहतूक ट्रेलरचे बेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.16) दुपारी सुमारे 4 वाजता घोडी पटांगण परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रेलरचे मोठे नुकसान झाले.

अपघातामुळे तासभर घाटातील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बीड येथून दिल्लीकडे 19 टन राजमा घेऊन जाणारा ट्रेलर (आरजे 11 जीसी 1303) अजिंठा घाट उतरत असताना अचानक बेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.

Ajintha accident
save trees campaign Jalna : झाडे जगविण्यासाठी ‌’योगा ग्रुप‌’चा आटापीटा

प्रसंगावधान राखत चालक रामनिवास कुशवा (40, रा. धोलपूर, राजस्थान) यांनी अनियंत्रित झालेला ट्रेलर डोंगराच्या कडेला असलेल्या नालीकडे वळवून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे ट्रेलर थांबविण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असून, चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.

दरम्यान, अपघातामुळे घाटातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

Ajintha accident
illegal tape in auto rickshaw : रिक्षात वाढता टेपचा दणदणाट : प्रवासी हैराण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news