MSRTC Bus Accident | केज–कळंब मार्गावर ट्रक व एसटीची धडक; चालक-वाहकासह ११ प्रवासी जखमी

जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
MSRTC Bus Accident | केज–कळंब मार्गावर ट्रक व एसटीची धडक; चालक-वाहकासह ११ प्रवासी जखमी
Pudhari
Published on
Updated on

Kej Kalamb Highway ST Bus Truck Collision

केज : केज–कळंब मार्गावर चिंचोली पाटीजवळ गुरुवारी ( दि. ५) सकाळी ट्रक आणि एसटी बसच्या झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक, वाहक आणि ११ प्रवासी असे एकूण १३ जण जखमी झाले. जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव आगारातील कोल्हापूर–माजलगाव ही बस (क्र. MH-20/BL-2555) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास माजलगावकडे जात होती. यावेळी केज–कळंब रोडवरील चिंचोली पाटीजवळ हॉटेल लालपरी समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (क्र. MH-20/CT-8487) बसची मागून जोरदार धडक बसली.

MSRTC Bus Accident | केज–कळंब मार्गावर ट्रक व एसटीची धडक; चालक-वाहकासह ११ प्रवासी जखमी
Beed News : सांगवीतील ‌‘चांदीचा खजिना‌’ तहसीलकडे; शेकडो नाणी गायब?

या धडकेत बसच्या कंडक्टर बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. अपघातात बसचे चालक आनंद गायके (वय ४०), वाहक विष्णू तांबडे (वय ४२) यांच्यासह ११ प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक जय जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला हातभार लावला. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांनी जखमींना तातडीने केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

MSRTC Bus Accident | केज–कळंब मार्गावर ट्रक व एसटीची धडक; चालक-वाहकासह ११ प्रवासी जखमी
Beed News | आजारपणाला कंटाळून वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने जीवन संपविले

जखमींची नावे

चालक आनंद गायके (४०), वाहक विष्णू तांबडे (४२) तसेच प्रवासी – संजय खरात (३५), चैतन संजय खरात (१६), भास्कर गायकवाड (३६), आशा कराड (२५), सचिन कराड (३०), रोशनी कराड (१८), भाग्यश्री गायकवाड (३०), पायल गायकवाड (१५) आणि सुनिता खरात (३२).

एसटी अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

अपघाताची माहिती मिळताच धारूर येथील एसटी आगाराचे नियंत्रक नवनाथ चौरे तसेच विभागीय कार्यशाळेतील तांत्रिक विभागाच्या यंत्र अभियंता श्रीमती पांडगिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

MSRTC Bus Accident | केज–कळंब मार्गावर ट्रक व एसटीची धडक; चालक-वाहकासह ११ प्रवासी जखमी
Beed Crime News | एकटी असल्याचा फायदा घेत विवाहितेचा छळ; राज्य महिला आयोगाच्या दखलींनंतर केजमध्ये ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका

केज–कळंब मार्गावर हॉटेल्स व धाब्यांसमोर अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढत असून वाहतूक शिस्तीबाबत कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news