Sambhajinagar News : पैठणगेटवरील १२५ दुकानांवर होणार आठवडाभरात कारवाई File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पैठणगेटवरील १२५ दुकानांवर होणार आठवडाभरात कारवाई

खुनाच्या घटनेनंतर मनपाचा निर्णय, बाधित ८१ मालमत्तांना बजावली नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Action will be taken against 125 shops on Paithan Gate within a week

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठणगेट येथील खुनाच्या घटनेनंतर महापालिकेने येथील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगररचना आणि अतिक्रमण विभागाने या रस्त्यावर टोटल स्टेशन सर्व्हे पूर्ण केले. यात पैठणगेट सर्कलच्या बाजूने १५ मीटर, नूतन कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ३० मीटर आणि सब्जीमंडई परिसरातील अंतर्गत रस्त्यावर ९ मीटर मार्किंगही केली असून, बाधित ८१ दुकानदारांना शनिवारी (दि. १५) नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आता आठवडाभरात या मालमत्तांवर बुलडोझर कारवाई होणार आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध रस्त्यांवर अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येत आहे.या मोहिमेत आतापर्यंत साडेपाच हजार बेकायदा बांधकामे काढण्यात आली आहेत. आता नऊ मोठ्या रस्त्यांवर मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यातच पैठणगेट परिसरात गेल्या आठवड्यात एका खुनाची घटना घडली. त्यानंतर

सिल्लेखान्यातील नागरिकांनी मुकुंदवाडीप्रमाणेच पैठणगेटवरील अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपायुक्त सविता सोनवणे, अभियंता राहुल मारखेडे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद आणि नागरी पथकाने सर्व्हे पूर्ण केला.

दरम्यान, डीपी रस्त्यावरही मार्किंग केली जाणार असून, अनधिकृत मालमत्तांवर कारवाई होणार आहे. येत्या आठवडाभरात पाडापाडीची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन

सुमारे १२५ मालमत्ता परवानगी न घेताच बांधकाम केल्याच्या आढळल्या आहेत. पोलिस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली आहे. महापालिकेने येथील दुकानदारांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काहींनी नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT