

PM Awas Yojana: List of eligible beneficiaries of PM Awas coming soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडेगाव, तिसगाव, हसूल, सुंदरवाडी या पाच ठिकाणी बहुमजली गृहप्रकल्प राबवित आहे. या सर्व प्रकल्पांचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर आहे. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याने लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी आढावा बैठकीनंतर दिली.
महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्प राबवित आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पडेगाव, तिसगाव, हसूल, सुंदरवाडी या ठिकाणी पाच ३२ हेक्टर जागा प्राप्त झाली होती. त्यापैकी बांधकाम योग्य जागांचा वापर करून महापालिकेने या नियुक्त केली. घरकुलांच्या कामासाठी एजन्सी सात मजली इमारत बांधली जाणार असून यात ११ हजार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या ५ ठिकाणचे हे बांधकाम प्रिंथलेव्हलवर आले आहेत. महापालिकेत नुकत्याच अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झालेल्या कल्पिता पिंपळे यांनी या कामाचा आढावा घेतला.
पिंपळे यांच्याकडे प्रशासक जी. श्रीकांत यांनी कर, निवडणूक, घरकुल, जनगणना या विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी ही आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त अपर्णा थेटे या होत्या. घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे. कंत्राटदारांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.
११ हजार जणांची होणार निवड
लाभार्थी निवडीसाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. ४० हजार ११ हजार लाभार्थ्यांमधून लाभार्थी निवडले जाणार आहे. हे लाभार्थी निवडताना त्यांची आर्थिक परिस्थिती, कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे पिंपळे यांनी सांगितले.