बेशिस्त रिक्षाचालकांना पुन्हा दणका; १२१५ चालकांना ११ लाखांचा दंड file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बेशिस्त रिक्षाचालकांना पुन्हा दणका; १२१५ चालकांना ११ लाखांचा दंड

शहरात बेशिस्तपणे आणि नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या, तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा मोहीम उघडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Action against undisciplined auto-rickshaw drivers; 1,215 drivers fined ₹11 lakh

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात बेशिस्तपणे आणि नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या, तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी पुन्हा मोहीम उघडली आहे. मंगळवारी (दि.२८) तब्बल १ हजार २१५ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारून ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात. ६ रिक्षाही जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

शहरात रिक्षा थांब्यांवर बेशिस्तपणे रिक्षा लावणे, प्रवाशांसी उद्धट व उर्मट वर्तन करणे, विनागणवेश रिक्षा चालविणे, फ्रंटसीट प्रवासी बसविणे, विनापरवाना आणि मोठ्या प्रमाणावर प्रलंबित दंड असलेल्या रिक्षाचालकांचा सुळसुळाट झाला होता. याला आळा घालण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२१५ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांच्या दंडापैकी १ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.

तसेच कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या सहा रिक्षा पोलिसांनी जमा केल्या आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, सचिन मिरधे आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT