Sambhajinagar News : आरोपी माझीनची दुबईत पाकिस्तानी तरुणाशी ओळख ; तपासात एटीएसची एन्ट्री ? file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : आरोपी माझीनची दुबईत पाकिस्तानी तरुणाशी ओळख ; तपासात एटीएसची एन्ट्री ?

एकाच वेळी चार तरुणींची फसवणूक; दोन हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर

पुढारी वृत्तसेवा

Accused Mazin met a Pakistani youth in Dubai; will the ATS get involved in the investigation?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून १४ तरुणींचे शारीरिक व आर्थिक शोषण करणाऱ्या मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद (३२, रा. काजीवाडा, भडकल गेट) याच्या चौकशीत धक्कादायक तपशील समोर आले आहेत. सध्या १४ दिवसांच्या कोठडीत असलेला माझीन एकाच वेळी चार तरुणींना एकमेकींचा सुगावा लागू न देता फिरवत होता.

यासाठी त्याने औरंगपुरा येथील दोन हॉटेल्समध्ये चक्क 'उधारीचे खाते' सुरू केले होते. दरम्यान, दुबईतील वास्तव्यात त्याची एका पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाल्याचे उघड झाल्याने या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पोलिस सूत्रांनी आलेल्या माहितीनुसार, जिममध्ये पिळदार शरीरयष्टी कमावलेला माझीन विविध खासगी कंपन्यांत नोकरी करत महिला सहकाऱ्यांशी जवळीक साधायचा.

कौटुंबिक संवाद साधून भावनिक जाळ्यात ओढण्यासाठी तो सुरुवातीला तरुणींना उसनवारीने पैसे देऊन विश्वास जिंकायचा आणि नंतर त्यांच्याकडूनच पैसे उकळायचा. 'कॅफेमध्ये भेटू' असे सांगून तो त्यांना औरंगपुऱ्यातील ठरलेल्या दोन हॉटेल्सवर न्यायचा. या हॉटेल्समध्ये त्याचे नियमित येणे-जाणे असल्याने कोणतेही ओळखपत्र न तपासताच त्याला रूम दिली जात होती.

नियम धाब्यावर बसवणारी ही दोन्ही हॉटेल्स आता पोलिसांच्या रडारवर आली आहेत. भंडाफोड होण्याच्या भीतीने दुबईला पसार झालेल्या माझीनची तेथे एका पाकिस्तानी तरुणाशी ओळख झाली. मात्र, त्यानेच गुंतवणुकीच्या बहाण्याने माझीनला गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याचे परदेशी कनेक्शन, आर्थिक व्यवहार आणि शोषणाची व्याप्ती पाहता एटीएसकडूनही समांतर तपास होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवला

मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आहे. त्याने मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याने तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दुबई व अन्य कोणत्या देशात प्रवास केला याचाही तपास करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT