Accident News : आखतवाडा फाट्याजवळ धावत्या स्कॉर्पिओला आग file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : आखतवाडा फाट्याजवळ धावत्या स्कॉर्पिओला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुढारी वृत्तसेवा

Accident News: Moving Scorpio catches fire near Akhatwada Phata

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : कसाबखेडा येथून कन्नडकडे निघालेल्या एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (एम एच २० जि क्यू ९९९४) या चारचाकी वाहनाला धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेरूळ परिसरातील आखतवाडा फाट्याजवळ गुरुवार (दि.२३) सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाहनमालक धनराज मानसिंग बिघोत (ध्वनी शेट) हे वैयक्तिक कामानिमित्त टापरगाव जात होते. आखतवाडा फाट्याजवळ पोहोचताच वाहनातून अचानक धूर निघू लागला. धूर दिसताच बिघोत यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. त्यानंतर समोरील बोनट उघडून पाहताच इंजिनमधून आगीचा मोठा भडका उडाला.

प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने वाहनापासून सुरक्षित अंतर घेतले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत वाहन पूर्णपणे - जळून खाक झाले होते. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT