Sambhajinagar News : महापालिकेचा 'स्वच्छतेची वारी-विठुरायाच्या' दारी उपक्रम

- महावीर चौकातून स्वच्छता दिंडीला होणार प्रारंभ : २०० कर्मचारी, १० हून अधिक घंटागाड्यांचा सहभाग
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar NewsFile Photo
Published on
Updated on

Municipal Corporation's 'Swachhatechi Vari-Vithurayachya Dari' Initiative

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून आषाढी एकादशीनिमित्त स्वच्छतेची वारी-विठूरायाच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार असून, उद्या शनिवारी (दि. २५) सकाळी १० वाजता महावीर चौकातून या स्वच्छता दिंडीला प्रारंभ होणार आहे. बाबा पेट्रोलपंप ते वाळूज पंढरपूर हा सुमारे आठ किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करत दिंडी पुढे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत गुरुवारी (दि.२३) एक बैठक घेण्यात

Chhatrapati Sambhajinagar
Crime News : 'अमिन डेव्हलपर्स'च्या अजितसिंग शिलेदारचा तहसील कार्यालयात राडा

आली. या दिंडीत २०० हून अधिक कर्मचारी आणि १० पेक्षा अधिक घंटागाड्यांचा सहभाग असणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेने स्वच्छतेची वारी-विठुरायाच्या दारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सकाळी १० वाजता महावीर चौकातून स्वच्छता दिंडीला प्रारंभ होणार असून, बाबा पेट्रोलपंप ते वाळूज पंढरपूर हा सुमारे आठ किलोमीटरचा मार्ग स्वच्छ करत दिंडी पुढे जाणार आहे. या स्वच्छता दिंडीत २०० हून अधिक कर्मचारी आणि १० पेक्षा अधिक घंटागाड्या सहभागी होणार आहेत. तसेच झाडू, फावडे हातात घेऊन कर्मचारी मार्गावरील कचरा संकलित करत पुढे मार्गक्रमण करणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Bribe Case : मटण दुकानाच्या परवान्यासाठी 'फोन पे'वर लाच

या उपक्रमातून वारकरी व नागरिकांमध्ये छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार असून, वारीनंतरही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा संदेश दिला जाणार आहे. दरम्यान, आषाढी एकादशीच्या काळात भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी महापालिका सर्व यंत्रणेसह सज्ज असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

वारी मार्गावर विशेष नियोजनवारी

शहरातील विठ्ठल मंदिरे, मंदिर परिसर आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात येणार आहेत. कचरा संकलनाची वारंवारता वाढविणे, अतिरिक्त घंटागाड्या उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news