Bribe Case : मटण दुकानाच्या परवान्यासाठी 'फोन पे'वर लाच

मनपाच्या पशुसंवर्धन कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Bribe Case
Bribe Case : मटण दुकानाच्या परवान्यासाठी 'फोन पे'वर लाचFile Photo
Published on
Updated on

Bribe for mutton shop license paid via 'PhonePe'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मटण विक्री दुकानाचा नवीन परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ६,५०० रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्य पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, आरोपीने लाचेची रक्कम चक्क 'फोन पे' वर स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Bribe Case
Ashadhi Ekadashi : प्रतिपंढरपुरात चोरांवर 'एआय' कॅमेऱ्यांची नजर; ४०० सीसीटीव्ही, ड्रोन सज्ज

ही कारवाई गुरुवारी (दि.२३) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास सिद्धार्थ उद्यानातील मनपाच्या पशुसंवर्धन कार्यालयात करण्यात आली. अजय भगवान रोकडे असे या आरोपीचे नाव आहे. तो मुख्य पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात कंत्राटी डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे.

अधिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या चुलत भावाने मटण विक्री दुकानाचा नवीन परवाना मिळण्यासाठी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या कामाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार हे भावाच्या वतीने कंत्राटी डाटा ऑपरेटर अजय रोकडे याला भेटले होते. परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात रोकडे याने ६,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यापैकी १ हजार रुपयांची रक्कम त्याने यापूर्वीच 'फोन पे'द्वारे स्वीकारली होती. दरम्यान, लाचेची उर्वरित रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने, त्याने एसीबीकडे तक्रार केली.

Bribe Case
Crime News : 'अमिन डेव्हलपर्स'च्या अजितसिंग शिलेदारचा तहसील कार्यालयात राडा

एसीबीच्या पथकाने २१ जुलै रोजी पडताळणी केली असता, रोकडे याने ६,५०० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच दिवशी त्याने आणखी ५०० रुपये 'फोन पे'द्वारे स्वीकारले. त्यानंतर २२ जुलै रोजी एसीबीने रचलेल्या सापळा कारवाईत आरोपीने उर्वरित ५,००० रुपयांची लाचही 'फोन पे'वरच स्वीकारली. लाचेची संपूर्ण रक्कम खात्यात जमा होताच एसीबीच्या पथकाने २३ जुलै रोजी आरोपी अजय रोकडे याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे, हवालदार राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे, चांगदेव बागुल यांनी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news