Abhijeet Dipke On E20 Petrol: अभिजीत दिपकेने आज छत्रपती संभाजी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने आरएसएस प्रमुख मोहन भागवतांपासून ते E20 पेट्रोलपर्यंत सर्व विषयांवर भाष्य केलं. त्याने आम आदमी पक्षाने इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनाला कॉक्रोज जनता पार्टी पाठिंबा देते असं सांगत एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले.
अभिजीत दिपके पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'E20 बाबत बऱ्याच लोकांनी बोललं आहे. हा देशातील महत्वाचा मोठा मुद्दा बनला आहे. मोठ्या उद्योगांसह आम आदमी पार्टीने देखील हा मुद्दा उचलला आहे. E20 बाबत जे आंदोलन होत आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. हा काही एका पक्षाचा मुद्दा नाहीये. तो एक खरोखरचा विषय आहे. त्यामुळं गाडीचं इंजिन खराब होतं. मायलेजवर फरक पडतोय जर तुम्ही शंभर टक्के पेट्रोल देत नाही. त्यात इथेनॉल मिसळत आहात तर मग १०० टक्के पेट्रोलचे दर कसे लावता.'
अभिजीत दिपकेने याचबरोबर संरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही वक्तव्य केलं. मोहन भागवत यांनी जेन झी सोबत चर्चा करण्याबाबत अभिजीत दिपके म्हणाला की, 'उशिरा का होईना तरूणाईशी बोलत आहेत.. ही एक चांगली सुरूवात आहे. मात्र तरूणांनी तरूणांसोबत बोललं तर चांगलं होईल. जोपर्यंत तरूण चेहरा पुढे आणणार नाहीत. तोपर्यंत या डायलॉगला काही अर्थ नाही. नवीन चेहरे, तरूण आणि शिकलेला चेहरा पुढे आल्यास चांगले होईल.
दिपकेने अतुल लिमये यांच्यावर देखील टिप्पणी केली. तो म्हणाला की, 'ज्या लोकांनी गांधींची हत्या केली ज्या लोकांनी आयुष्यभर अंबेडकरांचा विरोख केला. त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये.'
अभिजीत दिपकेने कॉक्रोज जनता पार्टीच्या बैठकीबाबत देखील माहिती दिली. तो म्हणाला, जंतर मंतरच आंदोलन झालं, त्यामध्ये आम्हाला काय शिकायला भेटलं आणि पुढे काय काय चांगलं करता येईल?यासाठीची बैठक आहे. आम्हाला हे आंदोलन देशभर कसं वाढवता येईल याच्यावर डिस्कशन होणार आहे. एकूणच कॉकरोच जनता पार्टीचा रोड मॅप काय असणार आहे. याबाबत दोन दिवस चर्चा होणार आहेत.
दोन दिवस आमची बैठक आहे. देशातील सर्व स्पोकपर्सन येणार आहेत, या बैठकीत जे डिस्कशन झालं ते बैठक संपल्यानंतर सांगितले जाणार आहे.