A young man was kidnapped and brutally beaten; he died during treatment.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून लोखंडी रॉड आणि चाकूने बेदम मारहाण करत त्याची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत अण्णा राऊत (१९, रा. रमाईनगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुलेट व दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्याचे २ जानेवारीला अपहरण करून भीम टेकडीवर नेऊन जबर मारहाण करून घाटी रुग्णालयाजवळ टाकून पसार झाले होते. उपचारदरम्यान बुधवारी (दि.७) अनिकेतचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हसूल पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपी संकेत मोतीलाल गायकवाड (२४), विकास शेषराव वाघमारे (२१) आणि आदित्य राजू आव्हाड (१८, तिघेही रा. एकतानगर, हसूल) यांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी गुरुवारी (दि.८) दिली. तिन्ही आरोपींना १३ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस गुन्ह्यात अटक केलेले आरोपी.
कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी अण्णा रंगनाथ राऊत (४०, रा. हसूल) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अनिकेत हा एमजीएम हॉस्पिटलमध्ये कामाला होता. २ जानेवारी रोजी सकाळी ६:४५ च्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला असता, आप्पासदन राधास्वामी कॉलनी परिसरात दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्याला बळजबरीने बुलेटवर बसवून अपहरण केले.
आरोपींनी त्याला भीमटेकडी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे तू आमच्या आंटीची छेड का काढतो? असा जाब विचारत लोखंडी रॉड, चाकू आणि लाकडी दांड्याने अनिकेतला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिकेतच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. पाठीवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मृत अनिकेत मकाईगेटजवळ टाकून पसार मारहाण केल्यानंतर आरोपींनी जखमी अनिकेतला मकाईगेट परिसरात टाकून पळ काढला. अनिकेतच्या वडिलांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. जखमी अनिकेतवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र जखमा गंभीर असल्याने ७ जानेवारी रोजी दुपारी १:२५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
अनिकेतच्या वडिलांनी ३ जानेव-ारी रोजी पोलिस आयुक्तालय आणि डीकेएमएम कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तोंड बांधलेला एक तरुण अनिकेतला अर्धवट कपड्यांच्या अवस्थेत दुचाकीवर बसवून नेत असल्याचे दिसून आले. मृत्यूपूर्वी अनिकेतने आपल्या वडिलांना इन्स्टाग्रामवरील फोटो दाखवून आरोपींची ओळख पटवून दिली होती. अधिक तपास पोलिस निरीक्षक स्वाती केदार करत आहेत.
आरोपी २ तास अमानुषपणे करत होते मारहाण
आरोपींनी अनिकेतला अर्धनग्न करून लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि धारदार चाकूने सपासप वार केले. पायाच्या नळगीवर रॉडने प्रहार केले. त्याच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला मकईगेटजवळ फेकून दिले आणि त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. तब्बल दीड तास आरोपी त्याला मारहाण करत होते. त्यानंतर ८ वाजेच्या सुमारास तो मकईगेट परिसरात मिळून आला.