

Land acquisition for industries from April: Atul Save
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ऑरिक अंतर्गत शेंद्रा, बिडकीन औद्योगिक वसाहतीत वाढत्या उद्योगांमुळे जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योगनगरीसाठी नव्याने ८ हजार एकर जागा संपादित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. हे भूसंपादन आता एप्रिलपासून सुरू करण्यात येईल, असे राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी (दि.८) मसिआ अॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्सपोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहराचा औद्योगिक विकास व्हावा व येथील स्थानिक उद्य ोगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे तसेच बेर ोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी मसिआच्या वतीने ऑरिक शेंद्रा येथे भव्य अॅडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्सपो २०२६ हे चारदिवसीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट, खा. कल्याण काळे, आ. अनुराधा चव्हाण, उद्योग सचिव डॉ. पी. अलबनगन, एमआयटीएल सीईओ पी.डी. मलिकनेर, टोयोटाचे सुदीप दळवी, जी. शंकरा, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, एक्सपोचे संयोजक अनिल पाटील, चेतन राऊत, उपाध्यक्ष राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिव सचिन गायके, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चौधरी यांच्यासह मसिआ पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. उद्घाटनानंतर मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली व उद्योजकांशी संवाद साधला.
जागतिकस्तरावर संधी : गायकवाड
प्रस्तावना संयोजक अनिल पाटील यांनी केली, तर मसिआचे अध्यक्ष गायकवाड यांनी एक्स्पोच्या माध्यमातून उद्योग, तंत्रज्ञान, नवकल्पना, मार्केटिंग व व्यवसायवृद्धीच्या नव्या संधी एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच एक्सपोला भेट देण्याचे आवाहनही केले.
राजकीय शक्ती उद्योगांच्या पाठीशी शिरसाट
ऑरिक अंतर्गत शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत टोयोटा, जेएसडब्ल्यूसह अनेक उद्योग येत आहेत. इथे येणाऱ्या उद्योगांना राजकीय त्रास नाही तर आमचे सहकार्य असते. आमची राजकीय शक्तीही उद्योग घालवण्यासाठी नाही तर उद्योगांना वाढवण्यासाठी काम करते, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगताना मसिआच्या एक्सपो आयोजनाचे कौतुक केले.
मसिआ औद्योगिक प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्टये
एक्सपोला उद्योजकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
ऑरिक सिटीच्या ५८ एकर परिसरात प्रदर्शन क्षेत्र.
१५०० स्टॉल, तब्बल ८४० विदेशी, मोठ्या कंपन्यांचा सहभाग.
अनेक देशांच्या शिष्टमंडळाची एक्सपोला भेट.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी योग्य व्यासपीठ.
उत्पादन क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन.
महिला उद्योजकांसाठी, स्टार्ट-अपसाठी विशेष व्यासपीठ.
अॅग्रिकल्चर फूड इंडस्ट्रीज.
एनर्जी अँड इलेकट्रिकल्स, इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी.
औद्योगिक क्षेत्रात सेवा-सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या.