Sambhajinagar News : कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथे तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कन्नड तालुक्यातील धनगरवाडी येथे तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

पाऊस गायब; पिके करपल्याने टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

A young farmer ended his life at Dhangarwadi in Kannad taluka

कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धनगरवाडी (औराळा) येथील एका ४० वर्षीय तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेतून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दी. २२) रात्री घडली. रामकृष्ण शंकर वाघचौरे शेतकऱ्याचे नाव आहे.

असे रामकृष्ण वाघचौरे यांची औराळा शिवारात पाच एकर शेती आहे. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी शेतात मका, कपाशी आणि तुरीची लागवड केली होती. मात्र, पेरणीनंतर सलग ५० दिवस पावसाने ओढ दिल्याने उभी पिके पूर्णपणे जळून हातातून गेली. शेतातील पिके करपल्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेत वाघचौरे मागील काही दिवसांपासून होते.

ता पाऊस आला तरी पिके हातात येणार नाहीत, अशी खंत त्यांनी दोन दिवसांपूर्वी कुटुंबाजवळ व्यक्त केली होती. दरम्यान, याच विवंचनेतून मंगळवारी रात्री साडेनऊला रामकृष्ण यांनी घरी विषारी औषध प्राशन केले.

ही बाब निदर्शनास येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, व दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT