Jewellery Theft समर्थनगरमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगारांची हातसफाई; फ्लॅटमधून ८ तोळ्याचे दागिने लंपास

हा प्रकार ८ ते २१ सप्टेंबर दरम्यान घडला.
Jewellery Theft
Jewellery Theft समर्थनगरमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगारांची हातसफाई; फ्लॅटमधून ८ तोळ्याचे दागिने लंपासfile photo
Published on
Updated on

Painting workers in Samarthanagar looted 8 tola worth of jewellery from a flat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समर्थनगर भागातील एका फ्लॅटमध्ये रंगकामासाठी आलेल्या कामगारांनी बेडरूममधील पर्समधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ८ ते २१ सप्टेंबर दरम्यान घडला. याप्रकरणी संशयित दोन कामगारांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jewellery Theft
Sambhajinagar News : किंग इज बॅक' म्हणत जामिनावर सुटलेल्या आरोपीची रॅली

शेख हुसेन शेख खाजा (३६, रा. जलाल कॉलनी) आणि अजमद खान रफिक खान (५२, रा. लोटा कारंजा) अशी संशयितांची नावे आहेत. फिर्यादी मनीष कन्हय्यालाल क्याडल (४१, रा. सागर रेसिडेन्सी, समर्थनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या फ्लॅटमध्ये ८ सप्टेंबर रोजी रंगाचे काम सुरू होते. यावेळी बेडरूममध्ये रंगकाम करणारे दोन कामगार दुपारी काही वेळासाठी बाहेर गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर कामगार निघून गेले.

दरम्यान, काही दिवसांनंतर २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनीष यांच्या पत्नीने आपली पर्स तपासली असता, त्यात लग्नात मिळालेले सोन्याचा राणी हार (२ तोळे), मंगळसूत्र (३ तोळे), सोन्याच्या बांगड्या (३ तोळे) असे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले.

Jewellery Theft
Water Supply Scheme : शहराला आता तीन ते चार दिवसांआड पाणी १८ जलकुंभ कार्यान्वित : सिडको-हडकोत वितरणाला वेग

घरात सर्वत्र शोधाशोध करूनही सोने सापडले नाही. यावरून ८ सप्टेंबर रोजी फ्लॅटमध्ये रंगकाम करणारे कामगार शेख हुसेन आणि अजमद खान यांनीच पर्समधील दागिने चोरल्याचा संशय क्याडल यांनी व्यक्त केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक इंगोले हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news